Deepika Padukone: दीपिका पदुकोणने रचला इतिहास: फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली भारतीय

दीपिका पदुकोण फिफा ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली भारतीय ठरली.
Deepika Padukone unveil the FIFA World Cup trophy
Deepika Padukone unveil the FIFA World Cup trophySaam Tv

Deepika Padukone In FIFA World Cup: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भारतात तिच्या रोज टीका होत आहे. भारतात जरी तिचा अपमान होत असला तरी संपूर्ण जगासमोर तिला मोठा सन्मान मिळाला आहे. भारताला अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली आहे. दीपिका पदुकोण फिफा ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली भारतीय ठरली. भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपिकाने फिफा विश्वचषक ट्रॉफीला एका खास ट्रकमधून लुसेल स्टेडियममध्ये नेले आणि त्या ट्रॉफीचे अनावरण केले.

6.175 किलो वजनाची आणि 18-कॅरेट सोने आणि मॅलाकाइटने बनलेल्या ट्रॉफीचे अनावरण करणे हा सामना सुरू होण्याआधी केला जाणारा समारंभाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे भारतासाठी हा एक जागतिक क्षण होता. दीपिका पदुकोणने स्पॅनिश व्यावसायिक फुटबॉलपटू, इकर कॅसिलास फर्नांडीझसह मैदानात फिफा ट्रॉफी घेऊन प्रवेश केला. (Football)

Deepika Padukone unveil the FIFA World Cup trophy
Mrs World: २१ वर्षांनी भारताला मिळाला बहुमान, सरगम कौशलने पटकावला मिसेस वर्ल्डचा किताब

पांढरा शर्ट, ब्राउन ओव्हरकोट, ब्लॅक बेल्ट असा लूक करून डीओईक फिफा ट्रॉफीचे अनावरण करण्यासाठी गेली होती. दीपिकाने भारताला अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी यावर्षी केल्या आहे. अभिनेत्री, निर्माती, उद्योजक आणि मानसिक आरोग्य सल्लागार दीपिकाच्या जागतिक कामगिरीमध्ये आणखी एक भर पडली आहे. (Deepika Padukone)

प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, जिथे ती ज्युरी सदस्य सुद्धा होती, 'गोल्डन रेशो ऑफ ब्युटी' नुसार जगातील टॉप 10 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत एकमेव भारतीय म्हणून दीपिका पदुकोणनेचा समावेश आहे. लक्झरी ब्रँड आणि अगदी पॉप कल्चर ब्रँडसाठी जागतिक चेहरा म्हणून निवडलेली दीपिका पदुकोण ही एकमेव भारतीय आहे.

भारतासाठी अनेक जागतिक मानसन्मान मिळवल्या दीपिकाची भारतात टीका होत आहे. या टीका करणाऱ्यांची भारताबाहेर ओळख तरी असेल का? असा प्रश्न विचारात नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांचा समावेश आहे. भारताचं मन उंचावणाऱ्या कलाकारांच्या सन्मान झाला पाहिजे अशी मागणी अनेक चाहते करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com