Deepika Padukone: दीपिकाची बिकीनी बनवणाऱ्या शार्लिनचे एका रात्रीत नशीब पालटले; ट्रोल झाल्यामुळे मिळणार...

सध्या शाहरुखचा 'पठान' चित्रपट बराच चर्चेत आहे. चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याची बरीच चर्चा होत होती.
Besharam Rang Song
Besharam Rang SongSaam Tv

Deepika Padukone: सध्या शाहरुखचा 'पठान' चित्रपट बराच चर्चेत आहे. चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याची बरीच चर्चा होत होती. अनेक राजकारण्यांनीही याला समर्थ केला असून काहींनी चित्रपटाविरोधात काही वक्तव्य ही केली आहे. आता तर अयोध्येतील संत परमहंसदास यांनी शाहरुखला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात पठाणचा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

Besharam Rang Song
Charles Shobharaj: ड्रग्स, मैत्री, प्रेम; चार्ल्स शोभाराजचे सिनेसृष्टीशी कनेक्शन...

गेल्या काही दिवसांपासून 'पठान' आणि त्या चित्रपटातील गाण्याशी संबंधित जोरदार वाद सुरु झाला आहे. चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही मुख्य भूमिकेत आहे. दीपिकानं घातलेली भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन बराच वाद विकोपाला गेला आहे.

त्यावरुन हिंदू महासभा आक्रमक झाली आहे. तिकडे मध्यप्रदेशचे नरोत्तम मिश्रा यांनी काहीही झालं तरी 'पठान' चित्रपट मध्यप्रदेशात हा प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे. काही मुस्लिम संघटनांनी देखील त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

Besharam Rang Song
Upcoming web series 2023: नवीन वर्षात चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवानी, अनेक बहूप्रतिक्षित वेबसीरिजचे येणार आगमी भाग...

मात्र यासगळ्यात चाहत्यांनी चित्रपटातील गाण्याचे बरेच कौतूक केले आहे. एकतर तब्बल चार वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर शाहरुख 'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुन:रागमन करत आहे. अशावेळी जगभर शाहरुखचा चाहतावर्ग पाहता चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासगळ्यात आणखी एका व्यक्तीला प्रकाशझोतात येण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Besharam Rang Song
Jhoome Jo Pathaan Song Out: शाहरुख- दीपिकाचे नव्या गाण्यात जबरदस्त ठुमके, 'झुमे जो पठान' गाण्यातील रोमान्स पाहून नजर हटेना...

दीपिकाची बिकीनी डिझाईन करण्याचे काम प्रसिद्ध स्टायलिस्ट शालिन नथानीनं केलं आहे. जशी दीपिकाची बिकीनी सध्या चर्चेत आहे तशीच शालिनच्या नावाचीही चर्चा होत आहे. तिची तर लॉटरीच लागली आहे.

त्यानंतर बॉलिवूडच्या आगामी मोठमोठया प्रोजेक्टमध्ये देखील शालिनची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. दीपिकाला भलताच बोल्ड टच देणाऱ्या शालिनच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतूक होताना दिसत आहे. स्वत: शालिनही कमालीची बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com