Deepika Padukone: दीपिकाची ऑस्करसाठी परदेशवारी, खास आऊटफिटने वेधलं साऱ्यांचंच लक्ष...

भारतासाठी यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा खास असून ९५ व्या ऑस्कर सोहळ्यात दीपिका पदुकोणवर मोठी जबाबदारी मिळाली आहे.
Deepika Padukone In Oscar Awards
Deepika Padukone In Oscar AwardsInstagram

Deepika Padukone In Oscar Awards: ऑस्कर २०२३ ला अवघे काही दिवसच उरले आहेत. १३ मार्च २०२३ रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळा परदेशात पार पडणार आहे. भारतासाठी यावर्षीचा प्रतिष्ठित अवॉर्ड सोहळा खास असणार आहे. ९५ व्या ऑस्कर सोहळ्यात दीपिका पदुकोणवर मोठी जबाबदारी मिळाली आहे. ती सादरकर्त्याची भूमिका साकारणार असून सोहळ्यासाठी नुकतीच दीपिका मुंबईहून ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना झाली आहे.

Deepika Padukone In Oscar Awards
Bharti Singh: प्राण्यांच्या उपमा द्यायचे..., बॉडी शेमिंगमुळे ट्रोल झालेली भारती अखेर बोलली

दीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी जाताना दिसली. यादरम्यान तिचा बॉसी लूक पाहायला मिळाला. विशेष म्हणजे पती रणवीर सिंग स्वतः दीपिकाला विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. रणवीरला पाहून 'साथीदार असावा तर असा' असं म्हणत त्याचे कौतुक केले.

नेहमीच रणबीर दीपिकाच्या पाठी उभा असतो, त्यामुळे त्याचे अनेकदा कौतुक होत असते. मात्र, रणवीर गाडीतून बाहेर पडला नाही. पण पापाराझींनी त्याला कारमध्ये पाहिले. यादरम्यान दीपिका पदुकोणने पापाराझींना पोज देत ऑस्करसाठी रवाना झाली.

२०२३ चा हा ऑस्कर सोहळा तीन कारणांमुळे भारतासाठी खास आहे. सर्वप्रथम, RRR मधील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळाले आहे. नाटू नाटू या गाण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलेच चर्चा होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, भारतातील दोन चित्रपटांना फिचर फिल्म्स कॅटेगरीत पुरस्कार मिळाले आहेत.तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे दीपिका पदुकोण ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी होणार आहे.

Deepika Padukone In Oscar Awards
१९९० मधल्या मॅच फिक्सिंगमागचं रहस्य बाहेर पडणार, ‘Caught Out’ चा थरारक ट्रेलर रिलीज

अमेरिकेच्या वेळेनुसार, ऑस्कर पुरस्कार सोहळा १२ मार्च २०२३ रोजी रात्री ८ वाजता पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर भारतातील वेळेनुसार, हा पुरस्कार सोहळा १३ मार्च रोजी सकाळी ५ वाजता भारतीय प्रेक्षक पाहू शकणार आहेत. ऑस्कर रेड कार्पेट प्रेस शो संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार असून, प्रेक्षक Oscars.org, YouTube TV किंवा Disney Plus Hotstar ऑस्कर पुरस्कार सोहळा पाहू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com