
Hema Malini Travelling Viral Video: ट्रॅफिक. कधी ही न संपणारा मुद्दा. अनेक सेलिब्रिटींनी मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळत शहर सोडण्याचा विचार केला. एकदा जर त्या ट्रॅफिकमध्ये अडकले की, आपण लवकर त्यातून सुटत नाही. हा मुद्दा सर्वांनाच नेहमी त्रास देतो. असाच त्रास नुकता हेमा मालिनी यांना झाला. हेमा मालिनी यांनी मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळत थेट मेट्राचा प्रवास केला.
अनेकदा काही सेलिब्रिटींनी ट्रॅफिकला कंटाळत मेट्रो किंवा रेल्वेचा पर्याय अवलंबला. आपल्या महागड्या गाड्या सोडून मेट्रोसारख्या सार्वजनिक गाड्यांचा पर्याय अवलंबला होता. हेमा मालिनी मंगळवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसल्या. यावेळी चक्क खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री मेट्रोचा प्रवास करत आहे, हे पाहून अचंबित झाले. मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून त्यांनी हा उत्तम पर्याय वापरला असल्याचे सांगितले.
यावेळी हेमा मालिनी यांनी मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. नुकताच त्यांनी ट्वीटरवर तो अनुभव शेअर केला. यावेळी हेमा मालिनी यांनी गुलाबी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या ट्राउझर घालत मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. मेट्रोमधील आपल्या प्रवासाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत हेमा मालिनी म्हणतात, मला कारमधून दहिसरला जायला दोन तास लागले होते. मी ट्रॅफिकला कंटाळून गाडीने नं जाण्याचा निर्णय घेतला. परत येताना कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय केला. मेट्रोने प्रवास केल्याने मी फार कमी वेळेत मी माझ्या ठिकाणी पोहोचले.
मेट्रोने प्रवास केल्यानंतर हेमा मालिनी यांनी डी.एन.नगर ते जुहूपर्यंत ऑटोने प्रवास केला. यासंदर्भात हेमा मालिनी यांनी लिहिले की, जेव्हा मी माझ्या घरी ऑटोमधून उतरले त्यावेळी माझ्या सेक्युरिटीला विश्वास बसत नव्हता की, मी रिक्षातून प्रवास केला आहे. अर्थातच हा अनुभव माझ्या साठी फारच खास होता. हेमा मालिनी यांनी रिक्षेत बसूनसुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.