
Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा 'दृश्यम 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. दरम्यान, कंगना रनौतने तब्बूचे भरभरून कौतुक केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीची तारणहार सुपरस्टार असे कंगनाने तब्बूचे वर्णन केले आहे. कंगनाने रविवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत तब्बूचे कौतुक केले. तिने लिहिले की, 'यावर्षी 'भूल भुलैया 2' आणि 'दृश्यम 2' हे दोनच बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये सुपरस्टार तब्बूजीने काम केले आहे.
'५० वर्षांचा टप्पा ओलांडूनही ती एकट्याने हिंदी चित्रपटसृष्टीला वाचवत आहे. तिची प्रतिभा आणि सातत्य यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, परंतु वयाच्या या टप्प्यावर स्टारडमच्या शिखरावर पोहोचणे खरोखरच कौतुकास्पद आहे. मला वाटते की महिलांना त्यांच्या कामाबद्दलच्या त्यांच्या अतूट समर्पणासाठी अधिक श्रेय दिले पाहिजे... त्या खरोखरच एक प्रेरणा आहेत.', असे कंगना म्हणाली. या पोस्टमध्ये कंगनाने तब्बूचे एक प्रेरणा म्हणून वर्णन केले आहे. (Actress)
अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तब्बू आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 37.07 कोटींची कमाई केली आहे. 'दृष्यम' हा हेच नाव असलेल्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे जो 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. श्रिया सरन या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर इशिता दत्ता त्यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. (Bollywood)
तब्बू 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 14 कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 185.92 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी केले होते. (Movie)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.