बॉलिवूड अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर, ओळखणंही झालं कठीण, दुःखद कहाणी सांगताना झाली भावुक

बॉलिवूड जगतातून धक्कादायक वृत्त समोर आलं असून, आणखी एका अभिनेत्रीला कॅन्सरनं गाठलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर, ओळखणंही झालं कठीण, दुःखद कहाणी सांगताना झाली भावुक
Bollywood actress mahima chaudhary breast cancer Latest NewsSAAM TV

मुंबई: बॉलिवूड जगतातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बी-टाउनची एकेकाळची ग्लॅमरस गर्ल आणि अभिनयात चमक दाखवलेली अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त आहे.

या वृत्ताने तिच्या चाहत्यांना आणि अवघ्या बॉलिवूडला धक्का बसला आहे. ब्रेस्ट कॅन्सर (Cancer) झालेली महिमा चौधरीचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

Bollywood actress mahima chaudhary breast cancer Latest News
बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली, इच्छेविरुद्ध मी...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी शेअर केली आहे. महिमा चौधरीसोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी संघर्ष करत आहे. या पोस्टमध्ये महिमा चौधरी खऱ्या 'हिरो' असल्याचे खेर म्हणाले.

एकेकाळी आपल्या सौंदर्यानं आणि ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांचे हृदय जिंकणाऱ्या महिमा चौधरीचा लूक ब्रेस्ट कॅन्सरनंतर पूर्णपणे बदलून गेला आहे. तिला व्हिडिओमध्ये पाहून ओळखणेही कठीण झाले आहे. महिमा लवकर बरी होईल अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे.

Bollywood actress mahima chaudhary breast cancer Latest News
नवसंजीवनी! कॅन्सर होणार बरा, सहा महिने उपचारानंतर रुग्ण ठणठणीत!

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी पोस्टमध्ये चाहत्यांना आवाहन केलं आहे. महिमाला तुमचं प्रेम, प्रार्थना, शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. ती सेटवर परत आली आहे आणि भरारी घेण्यासाठी सज्ज आहे, असंही अनुपम खेर म्हणाले.

भावुक झाली महिमा

महिमा चौधरी आपलं दुःख व्यक्त करताना भावुक झालेली व्हिडिओमध्ये दिसते. 'अनुपम खेर यांनी त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी कॉल केला होता. त्यावेळी माझ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वेब सीरीज आणि चित्रपटांत काम करावं यासाठी मला खूप कॉल येत आहेत. मात्र, मी करू शकले नाही,' असे ती म्हणाली.

अनुपम खेर यांनी त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली तेव्हा मी नकार देऊ शकले नाही. डोक्यावर केस नसल्याने चित्रपटात विग घालून काम करू शकते का, अशी विनंती त्यांना केली, असे महिमाने सांगितले. व्हिडिओमधून आपलं दुःख सांगताना ती खूपच भावुक झाल्याचे दिसत आहे. कॅन्सरची कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित तपासणीवेळी कॅन्सर झाल्याचे निदान झाले, असे तिने सांगितले.

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com