Parineeti Chopra : परिणितीचं आप नेत्याशी सूत जुळलं? दोघांचे मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

आपचे खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड आभिनेत्री परिणिती चोप्राचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
Pariniti Chopra
Pariniti Chopra parineetichopra

Parineeti Chopra-Raghav Chadha: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहद अहमद यांनी काही दिवसांपूर्वीच लगीनगाठ बांधली. तसं बॉलिवूड आणि राजकारणांच नातं काही लपून राहिलेलं नाही. आता अशीच आणखी एक जोडी चर्चेत आहे. आपचे खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड आभिनेत्री परिणिती चोप्राचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहेत.

राघव-परिणिती हे दोघे मुंबईत दोन वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे दोघेही डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये आल्याची माहिती आहे. त्यानंतर पुन्हा हे दोघे एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. यानंतर राघव आणि परिणिती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर मीडिया कॅमेऱ्यांपासून दोघेही नजर चुकवताना दिसले. दोघांनी मीडियाला एकत्र फोटो देणंही टाळलं. परिणितीने नंतर मीडिया कॅमेऱ्यासाठी पोझ दिली, मात्र काहीही बोलणं टाळलं.

Pariniti Chopra
Prajakta Mali New Serial: सूत्रसंचालनाकडून अभिनयाकडे; प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावर रिएन्ट्री

दोघे एकमेकांना डेट करत असल्याबाबत कुणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. अशावेळी कोणताही दावा करणे घाईचे ठरेल. पण दोघांचे फोटो पाहून चाहते बोलत आहेत, दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके.

Pariniti Chopra
Kangana Ranaut Video: वाढदिवसाच्या दिवशी टीका करणाऱ्यांचं कंगनाने केलं कौतुक; गोड हसत म्हणाली...

राघव चड्ढा आणि परिणिती चोप्राबाबत आणखी एक कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत असावेत अशीही चर्चा आहे. राघव चड्ढा आणि परिणिती दोघांचही शिक्षण ब्रिटनमध्ये झालं आहे. त्यामुळे दोघे तेव्हापासून एकमेकांच्या संपर्कात असू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com