
Priyanka Chopra Attempted Suicide: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. सध्या प्रियांका आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्वल करीत आहे. प्रियांका पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत परदेशात राहत आहे.
आज प्रियंका आपल्या व्यावसायिक जीवनात एक यशस्वी अभिनेत्री असली तरी, ती खासगी आयुष्यात कोणत्या तरी गोष्टीसाठी हताश आहे. परंतु एकेकाळी अभिनेत्री तिच्या आयुष्यापासून इतकी निराश झाली होती की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रियांकाने तिच्या सिनेकारकिर्दिच्या दिवसांत आत्महत्येचा प्रयत्न केला होता, याचा खुलासा खुद्द प्रियांकाचा मॅनेजर प्रकाश जाजू यांनी केला होता.
काही वर्षांपूर्वी प्रकाश जाजू यांनी अनेक ट्विट केले होते, ज्यात त्यांनी प्रियांकाच्या आत्महत्येविषयी सांगितले होते. त्यांनी लिहिले की, "आज इतकी मजबूत दिसणाऱ्या प्रियांकाने कधीकाळी 2..3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मी मोठ्या प्रयत्नाने तिला यापासून थांबवलं होतं. प्रियांका आणि एक्स बॉयफ्रेंड असीम मर्चंट यांच्यामध्ये अनेकवेळा भांडणे व्हायचे. प्रियांका रात्ररात्रभर चिंतेत असायची. तिने अनेकवेळा आपल्याला फोन केल्याचंही मॅनेजरने म्हटलं होतं."
पुढे प्रकाश जाजू यांनी लिहिले की, "एकदा असीमशी भांडण झाल्यानंतर प्रियंका मुंबईच्या वसई भागात ड्राईव्हसाठी आली आणि तिथे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रियंका आणि असीमच्या आईमधील नाते खूप चांगले होते, पण 2002 मध्ये असीमच्या आईच्या मृत्यूनंतर प्रियंका वसईत आली. इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या घटनेनंतर फ्लॅटच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील्स बसेपर्यंत प्रियंकाला खुर्चीला बांधून ठेवण्यात आले होते."
दरम्यान प्रकाश जाजूविरोधात प्रियांका आणि तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करत आपल्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मॅनेजरला काही काळ तुरुंगातही राहावं लागलं होतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.