Joe Jonas And Sophie Turner Divorce: जो जोनास- सोफी टर्नर झाले वेगळे, सोशल मीडियावर पोस्ट करत केली घोषणा

Joe Jonas And Sophie Turner News: जो आणि सोफीने (Joe Jonas And Sophie Turner) सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.
Joe Jonas And Sophie Turner
Joe Jonas And Sophie TurnerSaam tv

Joe Jonas And Sophie Turner News:

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्राचे (Priyanka Chopra-Jonas) सासरचं जोनास कुटुंबं सध्या चर्चेत आहे. प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास (Joe Jonas) आणि त्याची पत्नी अभिनेत्री सोफी टेर्नन (Sophie Turner) यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असून ते वेगळे होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. याच बातम्यांदरम्यान, जो आणि सोफीने (Joe Jonas And Sophie Turner) सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.

Joe Jonas And Sophie Turner
Jawan Leaked Online In HD Quality: ‘जवान’ च्या निर्मात्यांना मोठा झटका, चित्रपट प्रदर्शित होताच झाला लीक; कमाईवर होणार परिणाम?

दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी १ मे २०१९ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर हे जोडपे दोन मुलांचे पालक झाले. अनेकदा दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. हे दोघेही हॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल आहे. असताना देखील या कपलच्या ४ वर्षांच्या नात्यामध्ये दूरावा आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Joe Jonas And Sophie Turner
Jawan Theatre Video: शाहरूखची जबरा क्रेझ, जवानमधील 'जिंदा बंदा' गाण्यावर फॅन्सचा नुसता राडा, VIDEO

सोफी टर्नरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगळे होण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे. सोफीने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'आम्हा दोघांचे विधान. चार आश्चर्यकारक वर्षांनंतर आम्ही आमचे लग्न सौहार्दपूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे का करत आहोत याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण प्रत्यक्षात हा आमचा निर्णय आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की प्रत्येकजण आमच्या गोपनीयतेसाठी आणि आमच्या मुलांच्या इच्छेचा आदर कराल.'

Joe Jonas And Sophie Turner
Prashant Damle And Kavita Lad In KHC: ‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रशांत दामले, हॉटसीटवरून शेअर केली ‘मोरूची मावशी’ची सक्सेस स्टोरी

दुसरीकडे, गायक जो जोनास यांनी घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, 'दोन्ही पक्षांमधील विवाह अपरिवर्तनीयपणे तुटला आहे.' जोने आपल्या मुलांच्या जॉईन कस्टडीचीही मागणी केली आहे. जो आणि सोफी यांच्या पालकत्वाची योजना बनवण्यात कोर्टाने मदत करावी अशी जोची इच्छा आहे. जेणेकरून दोघेही त्यांच्या मुलींची काळजी घेऊ शकतील. जोने हे देखील सांगितले की, तो दोन्ही मुलींसोबत राहिल आणि त्यांना फिरायला देखील घेऊन जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घटस्फोटाचे कारण त्यांची जीवनशैली आहे. या कपलचा असा विश्वास आहे की, त्यांची जीवनशैली एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com