Rakhi Sawant: ड्रामा क्विन राखी सावंतचं नवं गाणं आलं...'झूठा'चा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर रिअल लाईफ'

राखीच्या खासगी आयुष्यात अनेक दुःखांना सामोरे गेल्यानंतर तिने आपल्या चाहत्यांना एक नवी भेट दिली.
Rakhi Sawant Jhoota New Song
Rakhi Sawant Jhoota New SongSaam Tv

Rakhi Sawant New Song Out: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्राणी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वादाचे खटके उडत आहे. यांच्यातील वाद हा खासगी राहिला नसून तो एक सार्वजनिक विषय ठरला आहे. राखीच्या खासगी आयुष्यात अनेक दुःखांना सामोरे गेल्यानंतर तिने आपल्या चाहत्यांना एक नवी भेट दिली.

राखी एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. राखीचे हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून त्या गाण्याचे नाव 'झूठा' असे आहे.

Rakhi Sawant Jhoota New Song
Satish Kaushik: सतिश कौशिक यांची अखेरची इच्छा अपूर्णच, पोटच्या मुलीसाठी करायची होती 'ही' गोष्ट

हे गाणे शुक्रवारी अर्थात काल प्रदर्शित झाले असून गेल्या काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. अखेर राखीचे अनेक वादानंतर गाणं प्रदर्शित झाले आहे. अवघ्या काही तासातच या गाण्याने लाखोंचा टप्पा पार केला. खरं तर हे गाणं राखीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असून प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

राखीचं हे गाणं अल्तमाश फरिदीने गायलं असून राखीसह सलमान शेखने यामध्ये अभिनय केला आहे. या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन कोरिओग्राफर मुदस्सर खानने केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com