Rashmika Mandanna Lavani: नॅशनल क्रशची मराठी सिने अवॉर्डमध्ये ठसकेबाज लावणी सादर होणार, चर्चा रंगणार बातमी गाजणार!

Zee Chitra Gaurav Puraskar: झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर रश्मिकाची ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ मधील लावणी व्हायरल होत आहे.
Rashmika Mandanna Lavani
Rashmika Mandanna LavaniInstagram/ @zeemarathiofficial

Rashmika Mandanna Zee Chitra Gaurav Lavani: नॅशनल क्रश म्हणून सर्वत्र चर्चेत असणाऱ्या रश्मिका मंदानाच्या मराठमोळ्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये ही आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या रश्मिकाने सर्वांनाच आपल्या एका स्माईलने घायाळ केले. सध्या झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर रश्मिकाची ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ मधील लावणी व्हायरल होत आहे.

Rashmika Mandanna Lavani
अजय लवकरच करणार आणखी एक धमाका, 'Singham Again' च्या माध्यमातून करणार ॲक्शन

रश्मिकाने आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आणि बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. पण आता ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार का? याची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये रश्मिका कोणती लावणी सादर करणार सध्या याची सर्वत्र चर्चा होत आहे. रश्मिकाने यामध्ये पूर्ण पणे मराठमोळा लूक केला आहे. या लूक मुळे सर्वत्र ती कोणतं गाणं सादर करणार याची चर्चा होत आहे.

यंदाही बॉलिवूड अभिनेत्री एका मराठी अवॉर्ड सोहळ्यात मराठमोळी लावणी सादर करणार आहे. त्यामुळे यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ची चांगलीच सर्वत्र हवा होत आहे. रश्मिकाने या मराठी अवॉर्ड शो मध्ये सादर केलेली लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे.

सोबतच यावेळी नॅशनल क्रश निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच या पुरस्कार सोहळ्याची फारच उत्सुकता आहे.

रश्मिकाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ मधील धमाकेदार परफॉर्मन्स २६ मार्च २०२३ रोजी संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com