
Sana Khan Mom To Be: बॉलिवूड कायमचा रामराम करणारी अभिनेत्री सना खान नेहमीच चर्चेत असते. सना काही वर्षांपूर्वी अल्लाहच्या मार्गावर जाण्यासाठी बॉलिवूड आणि अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अभिनेत्रीने मुफ्ती अनस सैयदशी लग्न केले.
लग्नाच्या दोन वर्षानंतर अभिनेत्रीने आई होणार असल्याचे सांगितले आहे. एका मुलाखतीत सना आणि तिचा पती मुफ्ती अनस सैयद यांनी ही गोड बातमी शेअर केली आहे.
एक टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीत सना आणि मुफ्ती अनस सैयद यांनी ते दोघे पालक बनणार असल्याचे सांगितले आहे. यावर्षी सना आणि मुफ्ती अनस सैयद यांनी पालक होणार असल्याचे सांगितले आहे. याआधी सनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या गुड न्यूज विषयी हिंट दिली होती. पतीसोबतच फोटो शेअर करत कॅप्शनद्वारे सनाने ही हिंट दिली होती.
सनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, अलहमदुलिल्लाह खूप आनंदी आहे. हा उमराह काही कारणास्तव खूप खास आहे, ज्याचे कारण मी लवकरच सर्वांसोबत शेअर करेन. अल्लाह हे सोपे करो. सणाच्या या पोस्टवरून तिच्या चाहत्यांनी ती आई होणार असल्याचा नादाज बांधला होता. तसेच कमेंट करून तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
सनाने २० नोव्हेंबर, २०२० साली मुफ्ती अनस सैयदशी लग्न केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सनाने ही माहिती दिली होती. सनाचा पती मुफ्ती अनस सैयदसोबतचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. तिने बॉलिवूड आणि अभिनय सोडला जरी असला तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.