
Sara Ali Khan Travel In Metro: आपला आवडत्या सेलिब्रिटीला चाहते नेहमीच फॉलो करत असतात. आवडत्या सेलिब्रिटीचे डेली रूटिन फॉलो करत त्यांचा पाठलाग करण्याचा देखील अनेक चाहते प्रयत्न करतात. सोशल मीडियावर सारा अली खान नेहमीच सक्रिय असते. सारा आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच कनेक्ट असते. गेल्या काही दिवसांपुर्वी साराने आणि तिच्या टीमने एकत्र मुंबई लोकलचा प्रवास केला होता. सध्या पुन्हा एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. चर्चेत राहण्याचे कारण, सध्या तिने मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास केला आहे. (Bollywood Actress)
नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओत तिने आपली अलिशान लक्झरी कार मधून प्रवास न करता थेट मेट्रोमधून प्रवास केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहे. अचानक सामान्य माणसाच्या गऱ्हाळ्यात कधी नव्हत सेलिब्रिटी दिसल्यावर अनेकांना थोडा वेळासाठी का होईना सुखद धक्का बसतोच. असंच असाच काहीसा किस्सा मुंबईतल्या मेट्रोतमध्ये दिसला. (Bollywood Film)
यावेळी साराने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची प्रिंटेड कुर्ती घालून प्रवास करताना स्पॉट झाली. यावेळी तिने सोशल मीडियावर ‘मुंबई मेरी जान’ म्हणत पोस्ट शेअर केली. माहितीसाठी सांगतो, सारा सध्या तिच्या अपकमिंग चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती सध्या ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचे शूटिंग या वर्षी जानेवारी महिन्यातच सुरू झाले. तिच्या सोबत चित्रपटात आदित्य रॉय कपूर झळकणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासु करत आहे. (Entertainment News)
चित्रपटात प्रमुख भूमिकेत सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर सोबत, अनुपम खेर, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, नीता गुप्ता, पंकज त्रिपाठी आणि अली फाजल हे कलाकार झळकणार आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासु आणि तानी बासु यांनी केले आहे. ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट यावर्षी ८ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. साराचा अखेरचा चित्रपट ‘गॅसलाईट’ ठरला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.