Shilpa Shetty New Look: शिल्पा शेट्टीची कातिल अदा, ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर; VIDEO पाहतच राहाल

Shilpa Shetty Killer Look: ब्लॅक कलरचा स्टायलिश ड्रेस घातलेली शिल्पा शेट्टी यावेळी आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसली.
Shilpa Shetty New Look
Shilpa Shetty New LookSaam Tv

Shilpa Shetty Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या लूक आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. शिल्पा शेट्टीच्या प्रत्येक अदांवर चाहते फिदा असतात. सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचे सुंदर लूक आणि स्टायलिश अवतार नेहमीच पाहायला मिळतो. नुकताच पार पडलेल्या लोकमत स्टायलिश अवॉर्डमध्ये शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस लूक पाहून सर्वजण थक्कच झाले. ब्लॅक कलरचा स्टायलिश ड्रेस घातलेली शिल्पा शेट्टी यावेळी आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसली.

Shilpa Shetty New Look
Munna Bhai 3 Shooting: 'मुन्नाभाई ३'चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

लोकमत स्टायलिश अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूडच्या सुंदरींचा जलवा पाहायला मिळाला. या शोमध्ये अनन्या पांडे, मलायका अरोरा, जेनेलिया डिसूझा, ईशा गुप्ता, रकुल प्रीत सिंग यासारख्या अभिनेत्रींनी सहभाग नोंदवला. या सर्व अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्टीने संपूर्णच लाइमलाइट खाल्ला. अवॉर्ड शोमध्ये शिल्पा शेट्टी स्लिम कंबर फ्लॉन्ट करताना दिसली. त्याचा हा ग्लॅमरस लूक पाहून अवॉर्ड शोमध्ये उपस्थिती लावलेल्या सर्वांच्या नजरा तिच्याकडेच होत्या.

Shilpa Shetty New Look
Shah Rukh Khan Video: 'जवान'च्या यशानंतर शाहरूख खान करतोय Chill; मन्नतचा व्हिडीओ व्हायरल

या अवॉर्ड नाईटसाठी शिल्पा शेट्टीने मर्मेड लूक निवडला होता. ज्यामध्ये ती तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसली. गोल नेक आणि फुल स्लीव्हज असलेला काळ्या रंगाचा टिनी ब्लाउज तिच्या ग्लॅमरस लुकमध्ये आणखीच भर टाकत होता. शिल्पाने ब्लाउजसोबत लो वाइस्ट मारमोट स्टाइलचा लाँग स्कर्ट कॅरी केला होता. या लूकमध्ये शिल्पा शेट्टीने तिची परफेक्ट कर्वी फिगर फ्लॉन्ट केली.

शिल्पा शेट्टीने या लूकवर आपले केस मोकळे सोडले होते. त्याचसोबत तिने लाईट मेकअप केला होता. सॉफ्ट स्मोकी आइज आणि बिमिंग हायलाइटर लूक त्याचसोबत गुलाबी रंगाची लिपस्टिक तिच्यावर आणखीच खुलून दिसत होती. शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

Shilpa Shetty New Look
Rhea Chakraborty In Bollywood Movie: रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्सालीच्या चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com