
Shraddha Kapoor Video Viral: बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्री उत्तम मराठी बोलतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, श्रद्धा कपूर. श्रद्धाने एका कार्यक्रमात अगदी एका महाराष्ट्रीयन मुलीसारखी मराठी बोलून दाखवली होती. मुख्य बाब म्हणजे, तिला शुद्ध मराठी भाषा देखील बोलता येते. तिच्या शुद्ध मराठीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. तिच्या बोलण्यातील निरागसता आणि नम्रपणा सर्व माध्यमांच्या कॅमेरामन्सने अनुभवला. यावेळी ती सर्वांसोबत आपुलकीने आणि आपल्या माणसांप्रमाणे संवाद साधला.
अनेक कार्यक्रमांमध्ये आपण श्रद्धाला मराठी भाषेत संवाद साधताना पाहिलं आहे. सोबतच तिच्याकडे असणारे मराठी भाषेबद्दलची आपुलकी, संस्कृतीबद्दल प्रेम, मराठी सणाचे प्रेम, तिचा मराठी लूक असूद्या सर्वांनाच अक्षरशः भावतो. सध्या सोशल मीडियावर ती बोलत असलेल्या दमदार मराठीने सर्वांनाच अक्षशः वेड लावले आहे. तिच्या अस्खलित मराठी भाषेने आपल्या चाहत्यांचे तिने मन जिंकले.
श्रद्धा नुकतीच माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाली. या वेळी ती गाडीतून उतरून एका ठिकाणी जात होती, त्यावेळी ती स्पॉट झाली. श्रद्धा कपूरला बघताच पापराझींनी तिला फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. यावेळी श्रद्धाने सर्व फोटोग्राफर्ससोबत थेट मराठीमध्येच संभाषण सुरू केलं. तेव्हा तिने सर्व पापाराझींची आपुलकीने त्यांची विचारपूस केली. तिने विचारलं, “तुम्ही सगळे कसे आहात?” त्यावर पापाराझी म्हणाले, “आम्ही छान आहोत. तुम्ही कशा आहात?” त्यावर श्रद्धा म्हणते, “मी मस्त.” असं म्हणत तिने संवाद साधला.
श्रद्धाच्या यावेळी लूकची देखील कमालीची चर्चा सुरू आहे. तिने बॉब कट ठेवल्या असल्याने त्यात ती कमालीची क्यूट दिसते. श्रद्धाचा बदललेला लूक पाहून फोटोग्राफर्सने कौतुक केले. त्यावर श्रद्धा उत्तर देत म्हणाली, “थँक यू. आता उन्हाळा पण वाढलाय ना.. म्हणून मी केस कापले.” आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून तिचा नम्रपणा पाहून चाहते भारावून गेले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी श्रद्धाच्या या स्वभावाचं आणि या मराठमोळ्या अंदाजाचं कौतुक करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.