Sonam Khan: 17 वर्षात लग्न, अंडरवर्ल्ड कनेक्शन; 30 वर्षांनंतर भारतात परततेय फेमस अभिनेत्री

90 च्या दशकात बिकिनी गर्ल म्हणून ओळखली जाणारी सोनम खान आता पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटसृष्टीत परतण्याच्या विचारात आहे.
Sonam Khan
Sonam Khan Saam Tv

Sonam Khan: 90 च्या दशकात बिकिनी गर्ल म्हणून ओळखली जाणारी सोनम खान आता पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटसृष्टीत परतण्याच्या विचारात आहे. सोनमने तिच्या खास मुलाखतीत सांगितले की, तिला खूप पूर्वीपासून पुनरागमन करायचे होते, पण ते शक्य झाले नाही. सोनमने या मुलाखतीत तरुण वयात बॉलिवूड सोडण्याचे कारण सांगितले आहे.

Sonam Khan
Har Har Mahadev: ....अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू

त्रिदेव चित्रपटातील 'ओये… ओये… नजर ने किया है इशारा' हे प्रसिद्ध गाणे तुम्ही ऐकले असेलच. या गाण्याच्या माध्यमातूनच सोनमने चाहत्यांच्या मनावर इतकी जादू केली होती की, चाहते माधुरी दीक्षित आणि संगीता बिजलानी जवळजवळ विसरले होते. पण सोनमने अचानक अलविदा करत बॉलिवूड जगताला मोठा धक्काच दिला. सोनमचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशीही जोडले गेले होते. याच कारणामुळे सोनमने देश सोडल्याचे बोलले जात आहे.

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, सोनमने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सोनम म्हणते, जर तिला संधी मिळाली तर तिला चित्रपटासह ओटीटी विश्वात पदार्पण करायला आवडेल.

Sonam Khan
Akshay Kumar: 'बेल बॉटम' पाकिस्तान विरोधात? अक्षय पाकिस्तानी प्रेक्षकाला प्रत्युत्तर देत म्हणतो, 'हा फक्त चित्रपट...'

सोबतच ती पुढे बोलते, मला तीन वर्षांपूर्वी परत यायचे होते, पण ते तेव्हा शक्य झाले नाही, नंतर कोविडही आला. भारतात सर्व गोष्टी परत सेट होण्यासाठी बराच वेळ लागला. भूतकाळातील गोष्टी भूतकाळात जाऊ द्या, असा आवाहनही तिने केलं आहे.

'बॉलिवूड सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे माझं लग्न होतं. मी त्रिदेवचे निर्माते राजीव राय याच्याशी लग्न केले, तेही अगदी लहान वयात. राजीववर जीवघेणा हल्ला झाला, त्यामुळे सोनमला भारत सोडून लॉस एंजेलिसला जावे लागले. त्यानंतर ती स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाली. पण नंतर 15 वर्ष वेगळे राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. सोनम आणि राजीव यांना एक मुलगाही आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या सहभागामुळे ते वेगळे झाले, असे मानले जाते.

Sonam Khan
Palak Tiwari: डिपनेक ब्लाऊजमध्ये पलक तिवारीची कमाल, चाहतेही तिच्या हॉटनेसच्या प्रेमात

वयाच्या 14 व्या वर्षी पदार्पण

तिच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना सोनम म्हणाली, जेव्हा मी 1988 मध्ये यश चोप्रा यांच्या विजय या चित्रपटातून माझ्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे अनेक नवीन ऑफर्स आल्या होत्या. मला अजिबात संघर्ष करावा लागला नाही. यानंतर मला त्रिदेव, मिट्टी आणि सोना या चित्रपटातून रातोरात प्रकाशझोतात आली. पण नंतर माझं लग्न झालं. त्यावेळी माझ्या मनात काय चालले होते ते मला माहीत नाही. मला माझे स्वतःचे कुटुंब हवे होते. त्यावेळी मी फक्त 17 वर्षांचा होतो.

Sonam Khan
Priya Ahuja: रिटा रिपोर्टर बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे झाली ट्रोल, लूकवरुन बोलणाऱ्यांना सुनावले खडेबोल

सध्या सोनम 50 वर्षांची आहे, तिला फिल्म इंडस्ट्री सोडून 30 वर्षे झाली आहेत. चित्रपट जगताबद्दल बोलताना सोनम म्हणते, इंडस्ट्रीने मला नेहमीच साथ दिली आहे. मला कधीच काही त्रास झाला नाही. माझ्या मनात कोणतीही खंत किंवा तक्रार नाही. मी किती लहान होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तेव्हा सगळे माझ्याशी लहान मुलीसारखेच वागायचे. गेल्या तीस वर्षांत मी जगभर फिरले. आणि हा संपूर्ण वेळ मी माझा मुलगा गौरव राय याला दिला आहे. ते माझे जीवन आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com