Sushmita Sen: सुष्मिताचं जोरदार कमबॅक, रॅम्पवॉक करत दाखवला जबरदस्त जलवा

हृदयविकाराच्या झटक्यानंतर बॉलिवूडची फिटनेस क्वीनने रॅम्पवॉक करत आपल्या फॅशनचा जलवा दाखवला.
Sushmita Sen Lakme Fashion Week Ramp Walk
Sushmita Sen Lakme Fashion Week Ramp WalkInstagram

Sushmita Sen Ramp Walk: बॉलिवूडची फिटनेस क्वीन सुष्मिता सेन सध्या आपल्या फिटनेस मुळे बरीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर सुष्मिताची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर तिने आपली हेल्थ अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर अनेक काळानंतर पहिल्यांदाच सुष्मिता रॅम्पवर परतली आहे.

Sushmita Sen Lakme Fashion Week Ramp Walk
Ajay Devgn Movie: अजय देवगणची 'भोला यात्रा' ठाण्यातून सुरू; चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवा उद्योग

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला व्हिडीओ हा लेक्मे फॅशन वीक मधला आहे. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानंतर पहिल्यांदाच सुष्मिता फॅशन रॅम्पसाठी दिसली. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत गोल्डन रंगाचा सुंदर आउटफिट घालून रॅम्प वॉक करताना दिसत आहे. तिने हातात एक सुंदर पुष्पगुच्छही घेतला होता. तिने रॅम्प वॉक करत कॅमेऱ्यासमोर अनेक पोज दिल्या आहेत.

Sushmita Sen Lakme Fashion Week Ramp Walk
Gautami Patil: शिंदेशाहीलाही गौतमीची भुरळ! आदर्श- उत्कर्ष शिंदेच्या आगामी गाण्यात थिरकणार 'सबसे कातिल गौतमी पाटील'

सध्या सुष्मिताची प्रकृती उत्तम असून आपल्या सदृढ आरोग्यासाठी ती रोज व्यायाम देखील करीत आहे. अशातच तिला रॅम्पवर बघून चाहते खूश झाले आहेत. रॅम्प वॉक करताना सुष्मिता सेनच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे. तिने मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला.

सुष्मिता सेन अनुश्री रेड्डीसाठी शो स्टॉपर बनली होती. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. अनेकांनी ‘क्वीन इज बॅक’ अशा कमेंट्स व्हिडीओवर केल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com