Sushmita Sen: फिटनेस क्वीन सुष्मिता सेनला हार्ट ॲटॅक, सोशल मीडियावरील पोस्टमुळे सर्वांनाच बसला धक्का

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याची माहिती तिनेच खुद्द सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Sushmita sen
Sushmita senSaam Tv

Sushmita Sen Heart Attack News: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याची माहिती तिनेच खुद्द सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी तिला चाहत्यांनी तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगितले आहे. सोबतच तिच्या उत्तम आरोग्यासाठी ही चाहते प्रार्थना करीत आहे.

Sushmita sen
Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा येतोय रुह बाबा... कार्तिकने दिली चाहत्यांना सिक्वेलची घोषणा; 'या' तारखेला येणार चित्रपट

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या तिची प्रकृती ठीक असल्याचे तिने सांगितले आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, तुमचे हृदय मजबूत आणि आनंदी ठेवा. तुमच्या वाईट काळात तो नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील. जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते. ही ओळ माझ्या वडिलांनी सांगितली होती. दोन दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अँजिओप्लास्टी झाली. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे हृदय खरोखर मोठे असल्याचे माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.

Sushmita sen
Jawan Movie: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन शाहरुखच्या 'जवान' चित्रपटात दिसणार नाही, 'हे' आहे मोठे कारण

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला वेळेवर रुग्णालयात नेले. त्याच्या तत्पर कारवाईमुळे मी सावरू शकले. त्यांच्याबद्दलही मी पुढच्या पोस्टमध्ये सांगेन. ही पोस्ट माझ्या चाहत्यांसाठी आहे. मी पूर्णपणे ठीक आहे ही चांगली बातमी शेअर करण्यासाठी, ही माझी पोस्ट होती.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 47 वर्षीय सुष्मिता सेन तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अभिनेत्रीच्या हृदयविकाराच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते.

अभिनेत्री नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दुसरीकडे, वर्क फ्रंटवर, अभिनेत्री लवकरच आर्या 2 मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्रीचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com