Taapsee Pannu FIR: तापसीला हटके फॅशन भोवली, नेकलेस घालणं पडलं महागात; पोलीसात तक्रार दाखल

तापसीने बोल्ड ड्रेसवर आराध्य देवी लक्ष्मीमातेचे लॉकेट गळ्यात घातले होते. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.
Taapsee Pannu FIR
Taapsee Pannu FIRInstagram

Taapsee Pannu FIR News: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने 14 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ एका फॅशन शोचा आहे. तापसीने बोल्ड ड्रेसवर आराध्य देवी लक्ष्मीमातेचे लॉकेट गळ्यात घातले होते. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.

इंदूरमध्ये, हिंदू रक्षक संघटनेने चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नूवर अश्लीलता पसरवल्याचा आणि हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे निमंत्रक एकलव्य गौरने छत्रीपुरा पोलिस ठाण्यात तापसीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Taapsee Pannu FIR
Na Aavadti Goshta: सायली आणि मृणालची ‘न आवडती गोष्ट’ माहितीये का? वाचा सविस्तर...

हिंदू रक्षक या संघटनेने याप्रकरणी अभिनेत्री तापसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास निदर्शने करण्यात येतील, असे तक्रारीत लिहिले आहे. या निवेदनानंनतर तापसी विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी हिंद रक्षक संयोजक एकलव्यनं केली आहे. आणि जर असं झालं नाही तर आम्ही हजारो तरुण रस्त्यावर उतरून यासंदर्भात विरोध प्रदर्शन करू अशी धमकी देखील पोलिसांना दिली आहे.

गौरने फोटोचे स्क्रीन शॉट्स पोलिस अधिकाऱ्यांना पुरावा म्हणून पाठवले, ज्यात तापसीने बोल्ड ड्रेसमध्ये हार घातलेला आहे. आता या निवेदनानंतर पोलिस तापसीवर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यावर म्हटलं आहे की, ''आम्हाला निवेदन मिळालं आहे आणि या पूर्ण प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ आम्ही मागवून घेतले आहेत,जे तपासले जातील त्यानंतर कारवाई बाबत विचार केला जाईल''.

Taapsee Pannu FIR
RC 15: कियाराची पहिल्यांदाच साउथ चित्रपटात एन्ट्री ! रामचरणसोबत झळकणार

नक्की प्रकरण काय आहे?

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने 14 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ एका फॅशन शोचा आहे. तापसीने बोल्ड ड्रेसवर आराध्य देवी लक्ष्मीमातेचे लॉकेट गळ्यात घातले आहे. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.

अभिनेत्रीने जाणूनबुजून हिंदू समाजाचा अपमान केल्याचे गौर यांचे मत आहे. तापसी पन्नूच्या विरोधात बीजेपी नेत्याच्या मुलानं इंदौर येथील छतरीपुरा पोलिस स्टेशनमध्ये एक निवेदन दिलं आहे. हिंदू रक्ष संघटनेचा संयोजक असलेल्या एकलव्य गौरने छतरीपुरा पोलिस ठाण्यात अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात कारवाई करण्या संदर्भात हे निवेदन दिलं आहे.

या निवेदनात लिहिलं की, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिनं खूप बोल्ड कपडे घातले होते. त्यावर आराध्य देवी लक्ष्मीमातेचं लॉकेट गळ्यात घातलं होतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com