
Tapsee Pannu: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे बराच चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘पठान’ प्रदर्शित झाला असून आगामी काळात ‘डंकी’ आणि ‘जवान’ प्रदर्शित होणार आहे. ‘डंकी’ चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नु देखील असणार आहे. नुकताच तापसीने एक मुलाखत दिली आहे. सध्या तिची मुलाखत सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.
लवकरच तापसी किंग खान सोबत अर्थात शाहरुख खानबरोबर रोमान्स करताना दिसून येणार आहे. तापसीने तिच्या मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच शाहरुखच्या घरी पहिल्यांदा पार्टीला गेल्याचा एक धमाल किस्सादेखील तापसीने या मुलाखतीमध्ये शेअर केला आहे.
तापसी मुलाखतीत म्हणते, “शाहरुख खान सरांनी त्यांच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीला मी आणि माझी बहिण आम्ही दोघीही गेलो होतो. त्यावेळी पार्टीला काही परदेशी पाहुणे देखील हजर होते. आम्ही जेव्हा पार्टीला त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा शाहरुख त्यांच्या सोबत बोलत होते.शाहरुख सरांना त्यांच्या मॅनेजरनी आम्ही आल्याचं त्यांना सांगितलं, शाहरुख सरांनी आम्हाला पाहताच त्या परदेशी पाहुण्यांना आमची ओळख करुन दिली.”
“यावेळी आमची ओळख करुन देताना शाहरुख सर म्हणतात, ही आमच्या देशातली एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. त्यांच्या अशा बोलण्याने माझं त्या पाहुण्यांसमोर थोडं गोंधळल्यासारखं झालं. माझ्या मागे आणखी कोण अभिनेत्री आहे का हे मी सहज पाहिलं. पण शाहरुख सर दुसऱ्या कोणबद्दल नाही तर माझ्याबद्दलच बोलत होते. तेव्हा शाहरुख सर म्हणाले, “आता तू माझी फजिती करू नकोस, मी तुझ्याबद्दलच बोललो आहे.” अशा रीतीने त्यांनी मला एवढं महत्त्व दिलं आणि पार्टी संपल्यावर ते मला माझ्या कारपर्यंत सोडायला आले.”
‘डंकी’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर काम करायला मिळालं याकरिता तापसी स्वतःला खूप नशीबवान समजते. तापसीचे सध्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नसले तरी, तिच्या आगामी चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत. शाहरुख खानबरोबरचा ‘डंकी’ आणि ‘हसीन दिलरुबा २’ या दोन्ही चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.