Vidya Balan Photoshoot: विद्याच्या फॅशन पुढं उर्फी सुद्धा फिकी...; एका वर्तमानपत्रात झाकलं पूर्ण अंग

फोटोमध्ये ती एका खुर्चीवर बसलेली दिसत असून हातात वर्तमानपत्र घेतलं आहे.
Vidya Balan
Vidya BalanSaam TV

Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विद्याने हिंदी सिनेसृष्टीला अनेक दमदार आणि यशस्वी चित्रपट दिलेत. मोठी प्रसिद्धी मिळवूनही विद्या नेहमीच सुंदर साड्या परिधान करणं पसंत असते. तिचं सोशल मीडिया पेज चेक केल्यावर त्यावर तिचे साडीतलेच फोटो पाहायला मिळतात. मात्र नुकताच तिचा असा एक फोटो समोर आला आहे ज्याने सगळेच थक्क झालेत. विद्याचा तो फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. (Latest Bollywood News)

Vidya Balan
Vidya Balan: विद्या बालनचा कसा होता फिल्मी दुनियेतील प्रवास, जाणून घेऊया तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी

एकही कपडा न घालता वृत्तपत्राने झाकलं अंग...

विद्या सध्या ४४ वर्षांची आहे. आजवर तिने अनेक भूमिका साकारल्यात. मात्र ती नेहमीच सिंपल लूकमध्ये दिसली आहे. अशात आता तिने एकही कापड न घालता हातात फक्त एक वर्तमानपत्र घेऊन फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये ती एका खुर्चीवर बसलेली दिसत असून हातात वर्तमानपत्र घेतलं आहे. पायात काळ्या हिल्स घातल्या असून दुसऱ्या हातात एक कॉफीचा मग घेतला आहे. डोळ्यांवर काळा गॉगल लावून विद्या यामध्ये बिंधास्त स्माईल देताना दिसत आहे. तिचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

Vidya Balan
Vidya Balan Birthday: विद्या बालनची संपत्ती माहिती का? संपत्ती जाणून व्हाल थक्क...

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. विद्याचे चाहते तिचा हा फोटो पाहून तिचं कौतूक करत आहेत, तर काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. विद्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटात बोल्ड अंदाजात दिसली होती. त्यावेळी देखील तिला ट्रोल केलं गेलं होतं.

विद्या बालनचा २००७ साली आलेला 'भूलभूलैया' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यात तिने प्रेयसी आणि भूताची भूमिका केली होती. तसेच या चित्रपटातील गाण्यांवर तिने केलेला डान्स देखील तुफान गाजला. मात्र आता विद्या बालनचा हा फोटो पाहून नेटकरी नाराज आहेत. तसेच काहींनी तिच्या या लूकचं कौतूक केलं आहे. सध्या अनेक कलाकार अशा पद्धतीचे फोटोशूट करताना दिसत आहेत.

डब्बू रत्नानी हा एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. त्यानेच विद्याचं हे फोटोशूट केलं आहे. डब्बूने आतापर्यंत शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, शहनाज अशा अनेक अभिनेत्रींचे फोटोशूट केलेत. त्यातील विद्याचा टॉपलेस फोटो चर्चेत आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com