बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड

शिल्पाने (Shiulpa Shetty) तिच्या मनगटावर एक स्वस्तिक'चे (swastik) चिन्हाचे टॅटू (Tattoos) काढून घेतले आहे. जे समृद्धीचे प्रतीक आहे.
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड Saam tv news

पडद्यावर अभिनय करताना बॉलिवूडच्या (Bollywood) कशाही असोत, पण खऱ्या आयुष्यात त्यांना आपल्या अनेक आवडीनिवडींसाठी देखील ओळखले जाते. अलीकडच्या काळात तरुणांमध्य टॅटूचे (Tattoo) ट्रेंड दिसून येत आहेत. बॉलीवूड अभिनेत्रीही यापासून कशा दूर राहतील. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या शरीरावर टॅटू काढून घेतले आहेत. तापसी पन्नू (tapsee pannu), कंगना रानौतपासून (Kangna Ranout) शिल्पा शेट्टीपर्यंत (Shilpa Shetty) अनेक अभिनेत्रीना टॅटूची आवड आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड Saam tv news

बॉलिवूड अभिनेत्री श्रुति हासन हिने तिच्या पाठीवर एक टॅटू देखील काढला आहे. श्रुतीने तिच्या पाठीवर तामिळ भाषेत स्वतच्या नावाचे टॅटू काढले आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड Instagram/@SonakshiSinha

बरेच लोकांना टॅटूची आवड असते. म्हणून ते काहीना काही टॅटू बनवत असतात. सोनाक्षी सिन्हाचा टॅटूही तसाच आहे. सोनाक्षीने आपल्या गळ्यात्या जवळ एक छोटासा स्टारचा टॅटू बनवलेला आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड Instagram/@Diyamirza

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिच्या मनगटावरील टॅटू अनेकदा तिच्या फोटोजमध्ये पाहायला मिळतो. दीया मिर्झाने आपल्या हातावर आजाद नावाचा टॅटू काढला आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड saam tv news

शिल्पा शेट्टी कुंद्रा सध्या तिचा पती राज कुंद्रामुळे चर्चेत आहे. शिल्पालाही टॅटू बनवायला आवडते हे फारच लोकांना ठाऊक आहे. शिल्पाने तिच्या मनगटावर एक स्वस्तिक चे चिन्हाचे टॅटू काढून घेतले आहे. जे समृद्धीचे प्रतीक आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड saam tv news

आपल्या बेताल वक्तृत्वामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतलाही टॅटूची आवड आहे. कंगना रनौतने तिच्या मानेच्या मागील भागावर एन्जिल विंग टॅटू बनविला आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड Saam tv news

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरलाही टॅटू काढायला खूप आवडते. अलीकडेच तिने आपल्त्याया मनगटावर एव्हल आयचा टॅटू आला आहे. हा टॅटू आपल्याला वाईट नजरेपासून वाचवितो, असे बोलले जाते.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड Saam tv news

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिलाही टॅटूची आवड आहे. सुष्मिताने तिच्या मनगटावर आणि पाठीवर टॅटू बनविले आहेत. पाठीवर जग्वारचा टॅटू आहे, तर मनगटावर संपूर्ण वाक्य लिहिलेले आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही आहे टॅटूचं फॅड Twittwe/@TapseePannu

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला टॅटू काढणे इतके आवडते की आतापर्यंत तिने तिच्या शरीरावर एकूण तीन भागांवर टॅटू बनविला आहे. पिंक या चित्रपटाच्या वेळी, त्याच्या गळ्यात मुक्त पक्ष्यांचा टॅटू काढला. त्यानंतर गेम ओव्हर चित्रपटाच्या वेळी, तिने आपल्या मनगटावर व्हिडीओ गेमच्या रिमोटचा टॅटू काढला. तर आता रश्मी रॉकेट चित्रपटाच्या आधी तापसीने पायावर एक टॅटू बनविला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com