अजय लवकरच करणार आणखी एक धमाका, 'Singham Again' च्या माध्यमातून करणार ॲक्शन

Ajay Devgn - Singham Again: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सिंघमच्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज आहे.
Ajay Devgn - Rohit Shetty
Ajay Devgn - Rohit ShettySaam Tv

Singham Again Release Date: बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि दिग्दर्शकांची जोडी फारच प्रसिद्ध आहे. त्यातील एक जोडी म्हणजे अजय देवगण आणि रोहित शेट्टीची. या जोडीने आतापर्यंत अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे सिंघम. सिंघम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

आता पुन्हा एकदा त्याच जोमात बॉक्स ऑफिसवर ही Rohit Sजोडी धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतंच चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा झाल्याची सध्या चर्चा होत आहे.

Ajay Devgn - Rohit Shetty
Amruta Khanvilkar: अमृताचा अभिनयासोबतच सुरू आहे ‘हा’ उद्योग, नवा व्यवसायपाहून तु्म्हीही लोटपोट व्हाल

गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अर्थात 'सिंघम अगेन'ची (Singham Again) घोषणा केली होती. आता या सिनेमाची रिलीज डेट ही समोर आली आहे. 2022 मध्ये अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली होती की, जवळपास महिनाभरानंतरही थिएटरमध्ये प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगण त्याच्या दिग्दर्शनातील डेब्यू चित्रपट 'भोला'मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी 30 मार्चला रिलीज होणार आहे.

Ajay Devgn - Rohit Shetty
Urfi Javed: उर्फीची फॅशनच तिच्यावर उलटली, उर्फी जोमात नेटकरी कोमात

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'च्या रिलीज तारखेची माहिती दिली. हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे शूटिंग जुलै 2023 मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाबाबत आणखी एक खास बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण अजय देवगणच्या लेडी लव्हची भूमिका साकारताना दिसणार आहे.

'सिंघम' फ्रँचायझी कॉप युनिव्हर्सचा एक भाग आहे. रोहित शेट्टीच्या गेल्या काही चित्रपटांप्रमाणेच कॅमिओ देखील ट्रेंडमध्ये आहेत. दीपिका पदुकोणने 'सर्कस'मध्ये छोटी भूमिका केली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांचा कॅमिओ दिसणार असल्याची बातमी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com