Bollywood Actor Homes: मन्नत, प्रतीक्षा....बंगल्यांची नावं ठेवताना सेलिब्रिटी काय विचार करतात? जाणून घ्या

सेलिब्रिटी आपले घर अतिशय सुंदर पद्धतीनं सजवतात. त्यांची घरेही पंचतारांकित हॉटेलपेक्षा काही कमी नसतात. याशिवाय अनेक कलाकार त्यांच्या घरांना बरीच वेगवेगळी नावेही देतात. आज आपण बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या घरांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Bollywood Celebrity
Bollywood Celebrity Saam Tv
Published on

स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचंच स्वप्न. ते घर मनासारखं सजवायला प्रत्येकाला आवडतं. या घराला काय नाव द्यावं, याचाही विचार केला जातो. घरात आपल्या आवडी- निवडीप्रमाणे महागड्या आणि चैनीच्या वस्तू ठेवायच्या असतात. सर्वसामान्य लोक काय अन् सेलिब्रिटी काय. बंगल्याला नाव देण्यामागं प्रत्येकाचा काहीना काहीतरी हेतू असतो.

सेलिब्रिटी आपले घर अतिशय सुंदर पद्धतीनं सजवतात. त्यांची घरेही पंचतारांकित हॉटेलपेक्षा काही कमी नसतात. याशिवाय अनेक कलाकार त्यांच्या घरांना बरीच वेगवेगळी नावेही देतात. आज आपण बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या घरांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Bollywood Celebrity
Bollywood Celebrity Saam Tv

अजय देवगण

अजय देवगणचा मुंबईतील जुहू परिसरात एक आलीशान बंगला आहे. तिथे तो, पत्नी काजोल आणि मुलांसोबत राहतो. अजयने त्याच्या बंगल्याचे नाव शिवशक्ती ठेवले आहे. अजय शिवभक्त असून तो पूजापाठ नेहमी करतो. याच कारणामुळे अजयने त्याच्या बंगल्याचे नाव शिवशक्ती ठेवले आहे.

Bollywood Celebrity
Bollywood Celebrity Saam Tv

शाहरुख खान

शाहरुख खानचा मन्नत बंगला अतिशय सुंदर आहे. या आलीशान घरात शाहरुख, पत्नी गौरी आणि मुलांसह राहतो. शाहरुखने हा बंगला पत्नीला देण्याचे ठरवले होते. गौरी त्यावेळी प्रेग्नंट होती, तेव्हा शाहरुखला वाटले की जर त्याला मुलगी झाली तर तिचे नाव सुहाना किंवा मन्नत ठेवू. पण नंतर त्यांना मुलगी झाल्यावर शाहरुखने मुलीचे नाव सुहाना ठेवले आणि घराचे नाव मन्नत ठेवले, असे सांगण्यात येतं.

Bollywood Celebrity
Bollywood Celebrity Saam Tv

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांचे मुंबईत जलसा आणि प्रतीक्षा हे दोन बंगले आहेत. प्रतीक्षा बंगल्याचे नाव अमिताभ यांच्या आई-वडिलांनी ठेवले होते. हे नाव एका कवितेतून घेतलं होतं.

Bollywood Celebrity
Bollywood Celebrity Saam Tv

रणबीर कपूर

रणबीर कपूरची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीर हे दोघेही सध्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. त्यांच्या लग्नाच्या वेळी कृष्णराज या त्यांच्या जुन्या बंगल्याचे नूतनीकरण केले जात होते. आता ते पूर्ण झाले आहे आणि रणबीर कपूर त्याची मुलगी, पत्नी आणि आई नीतू कपूर या बंगल्यात शिफ्ट होण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांचा बंगला ऋषी कपूर यांचे आई-वडील राज कपूर आणि कृष्णा कपूर यांच्या नावावर आहे.

Bollywood Celebrity
Bollywood Celebrity Saam Tv

शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते आहेत. त्यांच्या बंगल्याचे नाव रामायण आहे. सोनाक्षीने एका मुलाखतीत घराचे नाव रामायण ठेवण्यामागील कारण सांगितले होते. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न यांना राम, भरत आणि लक्ष्मण असे तीन भाऊ आहेत. त्याचबरोबर सोनाक्षीच्या भावांची नावे लव आणि कुश अशी आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com