Hrithik Roshan-Saba Azad: गर्लफ्रेंडची मन्नत पूर्ण करण्यासाठी हृतिक रोशनने केला १०० कोटींचा खर्च

हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील मन्नत नावाच्या इमारतीमधील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहेत.
Hrithik Roshan and Saba Azad to move in together in palatial Rs 100 crore apartment
Hrithik Roshan and Saba Azad to move in together in palatial Rs 100 crore apartmentSaam Tv

Hrithik-Saba New Apartment: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद यांनी आता एकत्र राहून त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही लवकरच एका आलिशान घरामध्ये शिफ्ट होणार आहेत. सबा आणि हृतिक रोशन अनेकदा एकत्र दिसतात. बहुतेक कार्यक्रमांमध्ये दोघांनाही एकत्र येताना स्पॉट करण्यात आले आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील मन्नत नावाच्या इमारतीमधील अपार्टमेंटमध्ये एकत्र राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Hrithik Roshan and Saba Azad to move in together in palatial Rs 100 crore apartment
Sushmita Sen Birthday: एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने दिल्या सुष्मिता सेनेला खास शुभेच्छा; पुन्हा येणार का एकत्र ?

हृतिक आणि सबाच्या नवीन घराचे काम सुरू आहे, जे पूर्ण झाल्यानंतर दोघे एकत्र राहतील. हृतिक रोशनने या इमारतीत दोन अपार्टमेंट घेतले आहेत ज्यासाठी त्याने सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. हृतिक रोशनने जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळ असलेल्या मन्नतमध्ये 97.50 कोटींना दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. सबा आणि हृतिकचे नवीन घर समुद्र किनाऱ्याजवळ आहे, जिथून खूप सुंदर दृश्य दिसते. (Hrithik Roshan)

स्टार कपलचे हे घर 38,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. 15व्या आणि 16व्या मजल्यावर असलेले हा डुप्लेक्स फ्लॅट असल्याचे म्हटले जात आहे. यातील एका फ्लॅटसाठी 67.50 कोटी, तर दुसऱ्या फ्लॅटसाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हृतिक आणि सबा काही काळ एकत्र राहण्याचा विचार करत आहेत आणि लवकरच हे पाऊल दोघेही उचलणार आहेत. हृतिक आणि सबा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. (Celebrity)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com