Shah Rukh Khan-Rishabh Pant; 'इंशाअल्लाह...' रिषभ पंतसाठी शाहरुखने मागितली दुआ

शाहरुखने पूर्ण केली फॅनची इच्छा, मागितली ऋषभ पंतसाठी दुआ.
Shah Rukh Khan-Rishabh Pant
Shah Rukh Khan-Rishabh PantSaam Tv

Shah Rukh Khan Spoke About Rishabh Pant's Health: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शाहरुखने त्याच्या फॅन्सशी संवाद साधण्यासाठी ट्विटर या संदर्भात #AskSRK हे सेशन सुरू केले आहे. या सेशनच्या माध्यमातून शाहरुख त्याच्या फॅन्सशी संवाद साधत असतो. Ask SRK हा हॅशटॅग वापरून शाहरुखचे फॅन्स त्याला अनेक प्रश्न विचारतात. दरम्यान, एका युजरने शाहरुखला क्रिकेटर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. यावर शाहरुख खानने लगेच उत्तर देखील दिले.

Shah Rukh Khan-Rishabh Pant
Pathaan Movie Controversy: शाहरूखच्या 'पठान' चित्रपटावरून गुजरातमध्ये राडा....

दर्शन शाह नावाच्या युजरने ट्विटरवर शाहरुखला विचारले की, ऋषभ पंत लवकर बरा होण्यासाठी यासाठी दुवा करा. यावर शाहरुख खानने लगेच उत्तर दिले की, ‘इंशाअल्लाह, तो लवकरच बरा होईल. तो एक फायटर आणि खूप स्ट्रॉन्ग व्यक्ती आहे."

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबरला रात्री दिल्ली-डेहराडून महामार्गावर भीषण अपघात झाला. डिव्हायडरला धडकल्यानंतर त्यांची कार उलटली आणि तिने पेट घेतला. ऋषभ पंतने हिंमत दाखवली आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने त्याला वेळीच गाडीतून बाहेर काढण्यात आले.

ऋषभला त्वरित जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. काल त्याला शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहरुख खानने ट्विटरवर 13 वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रसंगी त्याने ट्विट केले आहे की, “आता लक्षात आले की मी 13 वर्षांपासून ट्विटरवर आहे. तुम्हा सर्वांसोबत इथे राहून मजा आली आणि फॅन क्लबने मला खूप प्रेम दिले आहे. शुभेच्छा, सूचना, मीम्स, अपेक्षा, फुकटचे सल्ले असे सर्वकाही इथे अनुभवले. खऱ्या आयुष्यात तुमचे जीवन सुधारावे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com