
Anurag Kashyap On Shah Rukh Khan-Salman Khan
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप सध्या ‘हड्डी’ मुळे प्रचंड चर्चेत आहे. कायमच चर्चेत राहणाऱ्या या दिग्दर्शकाच्या काही वक्तव्यांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होतेय. मध्यंतरी अभिनेत्याने बिगबजेट कलाकारांसोबत काम करणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अभिनेता कमालीचा चर्चेत आला होता. नुकतंच अभिनेता अनुराग कश्यपने एका मुलाखतीत शाहरुखसोबत कधीच काम करू शकणार नाही. मात्र यामागचं कारण किंग खान नसून त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं त्याने सांगितलं आहे. सध्या अभिनेत्याचं हे वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं आहे.
नुकतीच अनुराग कश्यपने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली आहे. शाहरुख खानसोबत काम न करण्याचा निर्णय का घेतला?, या प्रश्नावर अनुराग कश्यपने शाहरुखसोबत काम न करण्यामागील सविस्तर कारण सांगितलं आहे. अनुराग मुलाखतीत म्हणतो, “मी शाहरुखसोबत काम करू शकणार नाही. त्याचं फार मोठं व्यक्तिमत्व आहे. माझा ‘बॉम्बे वेल्वेट’सारखा चित्रपट फ्लॉप होऊ शकतो, याची भिती वाटते. माझा जर कोणता चित्रपट फ्लॉप ठरला तर मी संपूर्ण डबघाईला जाईल. त्याला माझ्या चित्रपटात घेणं म्हणजे खूप कठीण काम आहे. माझ्या चित्रपटात तो काम करणं म्हणजे एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न नेहमीच अपूर्ण राहिल. तिथपर्यंत मी कधीच पोहोचू शकत नाही.”
मी कधीच शाहरुख खानसोबत काम करण्याचा विचार केला असं नाही. अनुराग सांगतो की, “मी अनेकदा प्रयत्न केले, पण ते यशस्वी होऊ शकले नाही. प्रत्येक चित्रपटात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणारा मी दिग्दर्शक असल्यामुळे तो शाहरुखच्या चाहत्यांना कधीच खूश करू शकणार नाही, असे मला वाटत होते. तो बॉलिवूडमधल्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख आज बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातला अभिनेता आहे. माझी त्याच्यासोबत काम करण्याची कधीच समस्या नाही. त्याच्या चाहत्यांच्याही रणबीर कपूरच्या चाहत्यांप्रमाणेच मोठ्या अपेक्षा आहेत..”
अनुराग आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या भागात म्हणाला, “अभिनेता जितका मोठा, तितकाच त्याचा चाहतावर्ग मोठा असतो. त्यांची मी निराशा करेल, त्यांच्या अपेक्षा अपूर्णच ठेवेल. म्हणून त्यांचा चाहतावर्ग माझ्यावर निराश होण्याची शक्यता आहे. मी नेहेमीच नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. फॅन्स जेवढे जास्त तेवढा त्यांना तितक्या नव्या गोष्टी नको असतात. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मी माझ्यावर निराश होण्याची संधी देणार नाही. म्हणूनच मी किंग खानसोबत काम करू शकत नाही.”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.