The Vaccine War: 'माहीत नसलेले युद्ध तुम्ही लढले आणि जिंकले'; विवेक अग्निहोत्री कोरोनाच्या लसीचे रहस्य उलगडणार

विवेक अग्निहोत्रींनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी 11 भाषांमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Vivek Agnihotri Movie New Poster
Vivek Agnihotri Movie New PosterTwitter/ @vivekagnihotri

Vivek Agnihotri New Movie: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ' द काश्मीर फाइल्स' च्या सर्वाधिक यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. नव्या चित्रपटाचे 'द व्हॅक्सिन वॉर' असे नाव आहे (The Vaccine War). 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी 11 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. चित्रपटाची संकल्पना स्पष्ट करणाऱ्या पोस्टरसह दिग्दर्शकाने 10 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नव्या चित्रपटाची घोषणा केली. (Bollywood)

Vivek Agnihotri Movie New Poster
मुलाकडून मिठी, आईकडून दुर्लक्ष; कंगना- जया पुन्हा एकदा ट्रोल

'द व्हॅक्सिन वॉर'च्या पहिल्या पोस्टरमध्ये लसीची बाटली दिसत असून त्यावर शीर्षक लिहिलेले आहे. पोस्टरमध्ये लिहिले की, ''तुम्हाला माहीत नसलेले युद्ध तुम्ही लढले आणि जिंकले." चित्रपटाबद्दल माहिती अद्याप गुलदस्त्यात असली तरी, हा चित्रपट ज्या थीमवर आधारित आहे त्या विषयावर हे नाव बरेच काही सांगून जात आहे. ज्यावरून भारतीय जैव-शास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसींबद्दल काही प्रकरणे उघडतील. (Covid 19) (Covid Vaccine)

Vivek Agnihotri Movie New Poster
Kantara Movie: थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा 'कांतारा' OTT वर येणार का? आली मोठी अपडेट

विवेकने ट्विटरवर अशी रोमांचक घोषणा केली की, "घोषणा: 'द व्हॅक्सिन वॉर' सादर करत आहे - भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. आणि त्याच्या विज्ञान, धैर्य आणि महान भारतीय मूल्यांनी जिंकली. स्वातंत्र्यदिनी, 2023 रोजी 11 भाषांमध्ये रिलीज होईल. कृपया आम्हाला आशीर्वाद द्या. #TheVaccineWar."

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “पहिल्यांदाच 11 भारतीय भाषांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येथे भारतीय चित्रपट उद्योगाला एक म्हणून एकत्रित करण्यात मदत करण्याचा आमचा नम्र उपक्रम आहे. #BharatKaapnaCinema."

शीर्षकानुसार, हा चित्रपट महामारीच्या काळात भारतात बनवलेल्या कोविड-19 लसीवर आधारित असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, इंग्रजी, बांगला, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि गुजराती भाषेत प्रदर्शित होणार आहे.

2022 वर्षाच्या सुरुवातीला ' द काश्मिर फाइल्स ' चित्रपट प्रदर्शित झाला होता. नुकतेच ऑस्कर चित्रपटांची बरीच चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होती. त्या शर्यतीत विवेक अग्निहोत्रींचा 'द काश्मिर फाइल्स' चित्रपटही होता. पण त्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाले नाही.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे फार चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘दिल्ली फाइल्स’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. गेले काही महिन्यांपासून ते या चित्रपटावर काम करत आहेत.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com