Adipurush Cast Fees: ‘आदिपुरुष’ साठी सेलिब्रिटींनी घेतले तगडे मानधन; ट्रोल होणाऱ्या सैफचं मानधन पाहाल तर व्हाल अवाक....

प्रभास, कृति सनन सह सैफ अली खान सारख्या बड्या सेलिब्रटींची फौज असलेला ‘आदिपुरुष’ सिनेमा येत्या १६ जून २०२३ला प्रदर्शित होत आहे.
Adipurush Cast Fees
Adipurush Cast FeesSaam Tv

Adipurush Cast Fees: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. बिग बजेट असलेल्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् सर्वांनाच आता चित्रपटाची चाहूल लागली. प्रभास, कृति सनन सह सैफ अली खान सारख्या बड्या सेलिब्रटींची फौज असलेला ‘आदिपुरुष’ सिनेमा येत्या १६ जून २०२३ला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे.

गेल्या वर्षी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला टीझर नेटकरी कमालीचे संतापले होते. व्हिएफएक्समध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने चित्रपट तेव्हाच वादाच्या अग्रस्थानी आला होता. चित्रपटातील व्हिएफएक्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल सांगितल्यामुळे चित्रपटाचं बजेटही बरंच वाढलं. त्यामुळे हे सगळं ओझं निर्मात्यांवर आलं असणार हे निश्चित. यादरम्यानच आता समोर आलं आहे 'आदिपुरुष'च्या स्टारकास्टचं तगडं मानधन.

Adipurush Cast Fees
Raj Thackeray In Khupte Tithe Gupte: पहिल्याच भागात राज ठाकरे येणार! अनेक गुपिते उलगडणार

‘आदिपुरुष’च्या स्टारकास्टच्या मानधनाची माहिती समोर आली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या सर्वच कलाकारांनी या प्रोजेक्टसाठी तगडं मानधन स्विकारलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं एकूण बजेट ७०० कोटीं पर्यंत पोहोचल्याची सध्या चर्चा होत आहे. म्हणजेच, एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी शाहरुख खानच्या ‘पठान’सारखे दोन चित्रपट आरामात या बजेटमध्ये बनवता आले असते. खरं तर, ‘पठान’चं बजेट 300-350 कोटींच्या घरात होतं.

टी-सीरीजच्या बॅनरखाली निर्मित केलेला ‘आदिपुरुष’साठी प्रभासने तब्बल १५० कोटी रुपये इतकं मानधन स्विकारलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘स्पॉटबॉय’च्या रिपोर्टनुसार, ‘बाहुबली’ स्टार प्रभास लवकरच ‘प्रोजेक्ट-के’ ते ‘सलार’सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान, ‘आदिपुरुष’साठी प्रभासने १५० कोटी रुपये इतके मानधन स्विकारले.

तर ‘आदिपुरुष’साठी क्रिती सननने देखील आपल्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. एका मिडीया रिपोर्टनुसार, क्रितीने ३ करोड रुपये इतकं मानधन स्विकारलं आहे, अर्थात अद्याप या मानधनाविषयी अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Adipurush Cast Fees
The Kerala Story : 'द केरला स्टोरी'वर बंदी का? सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला परखड सवाल

तर रावणाच्या भूमिकेत असलेल्या सैफ अली खाननं देखील तगडं मानधन स्विकारल्याचं बोललं जात आहे. प्रभासला सैफने दिलेली अफलातून टक्कर पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सैफनं त्याच्या भूमिकेसाठी थेट १२ करोड रुपये इतकं मानधन आकारल्याचे बोलले जात आहे.

सनी सिंग ‘आदिपुरुष’ मध्ये श्रीरामाचे छोटे भाऊ लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सनीला १.५ करोड रुपये मानधन मिळाल्याचं बोललं जात आहे. कलाकारांच्या या तगड्या मानधनामुळे आणि बिग बजेट चित्रपटामुळे चित्रपटाचं एकूण बजेट ७०० कोटींवर पोहोचलं आहे. अर्थात या सगळ्या आकड्यांविषयी निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Adipurush Cast Fees
Jennifer Mistry Allegations Video: जेनिफर मेस्त्रीच्या आरोपांना निर्मात्याने फेटाळलं, अभिनेत्री थेट व्हिडीओच केला शेअर

रिपोर्ट्सनुसार,‘आदिपुरुष’ साठी निर्मात्यांची पहिली पसंत रामचरण,अल्लू अर्जून आणि महेश बाबू होते. पण या कलाकारांसोबत गोष्टी जुळून आल्या नाहीत तेव्हा स्क्रीप्ट प्रभासकडे गेली आणि प्रभासनं लागलीच स्क्रीप्टला आपली सहमती दर्शवली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com