Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा येतोय रुह बाबा... कार्तिकने दिली चाहत्यांना सिक्वेलची घोषणा; 'या' तारखेला येणार चित्रपट

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत कार्तिक आर्यनने चाहत्यांना 'भूल भुलैया 3'बद्दल माहिती दिली आहे.
Bhool Bhulaiyaa 3 Announcement
Bhool Bhulaiyaa 3 AnnouncementSaam Tv

Bhool Bhulaiyaa 3 Announcement: बॉलिवूड सेलिब्रिटी कार्तिक आर्यन 'भूल भुलैया 2'ला मिळालेल्या घवघवीत यशामुळे बराच चर्चेत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. रूह बाबा लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत कार्तिक आर्यनने चाहत्यांना 'भूल भुलैया 3'बद्दल माहिती दिली आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Announcement
Billi Billi Song: 'बिल्ली बिल्ली'मध्ये सलमानच्या हूक स्टेप्सने लावले चार चाँद, अवतरली सर्वच कलाकारांची मांदियाळी

कार्तिक आर्यनने इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भवानीगडच्या हवेलीची झलक दिसत आहे. पार्श्वभूमीत कार्तिक आर्यनचा आवाज ऐकू येतो ज्यामध्ये तो म्हणतो, 'क्या लगा कहानी खत्म हो गई है? दरवाजे तो बंद होते ही हैं ताकि एक दिन फिर से खुल सके'. त्याच वेळी, कार्तिक आर्यन खुर्चीवर रुह बाबाच्या भूमिकेत दिसत असून 'अमी जे तोमर' गाणे गुणगुणताना दिसत आहे.

कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया 3' पुढील वर्षी 2024 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'भूल भुलैया 2' प्रमाणेच याचे दिग्दर्शनही अनीस बज्मी करणार आहेत.

अभिनेता कार्तिकच्या या व्हिडिओवर यूजर्स अक्षय कुमारचे नाव घेऊन कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'हा तर अक्षय पेक्षाही हुशार निघाला', 'चित्रपटात कार्तिक नको तर अक्षयच हवा आहे' तर आणखी एक युजर म्हणतो, ' अक्षय सारखा कॅमिओ करण्याची हिम्मत आहे का ' अशा प्रकारे नेटिझन्स अक्षय कुमारबद्दल कमेंट करत आहेत. या सिक्वेलमधला पहिला चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.

Bhool Bhulaiyaa 3 Announcement
Sayali Sanjiv: अभिनय सायलीला म्हणतोय 'ये ना पुन्हा', नेमकं काय आहे प्रकरण?...

कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, कार्तिक आर्यनचा 'शहजादा' काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, ज्यामध्ये त्याने क्रिती सेननसोबत काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. सध्या, कार्तिक आर्यन 'सत्य प्रेम की कथा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात कार्तिक आर्यनची जोडी कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. याआधी 'भूल भुलैया 2'मध्ये दोघांची केमिस्ट्री चांगलीच आवडली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com