बॉलिवूडसोबत टॉलिवूडला देखील वाटतेय 'ही' भीती, घेतले काही महत्वपूर्ण निर्णय...

सिनेसृष्टीतील चित्रपटांची कमाई पाहता दाक्षिणात्य सिनेमांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
Bollywood Movies
Bollywood Movies Saam Tv

मुंबई: सध्या बॉयकॉट ट्रेंडने बॉलिवूडला चांगलेच घेरले आहे. बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खास कमाई केली नाही. तशीच भीती आता टॉलिवूडला आपल्या चित्रपटांबद्दल वाटत आहे. तेलगू प्रोड्युसर्स काऊंन्सिलने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. चित्रपटांच्या शूटिंग काही दिवसांसाठी थांबवले जात आहे, असे स्पष्ट केले. बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांची कमाई पाहता शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

Bollywood Movies
Salman Khan: भाईजानकडून वाढदिवसानिमित्त चाहत्यांना अनोखी भेट !

सध्या बॉक्स ऑफिसवरील 'ब्रम्हास्त्र' चित्रपट कोट्यावधींची कमाई करीत आहे परंतु, काही महिन्यानंतर एक वेगळाच महत्वपूर्ण निर्णय दाक्षिणात्य भारतीय सिनेमासृष्टीने घेतला. यावेळी तमिळ चित्रपट निर्माते सांगतात की, चित्रपट प्रदर्शनाच्या तीन दिवसानंतर चित्रपटाची समिक्षा (Film Review) करावी. कारण लगेचच चित्रपटाची समीक्षा केल्यास चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नाही. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाची वेगळी प्रतिमा तयार होते. त्यामुळे बॉलिवूडची स्थिती पाहता टॉलिवूडने हा चांगला निर्णय घेतला आहे.

Bollywood Movies
Boycott Trend: बॉलिवूडवरील बॉयकॉट ट्रेंडला 'द कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाचा पाठिंबा

तसेच तमिळ फिल्म प्रोड्युसर्स काऊंन्सिलने चित्रपट प्रदर्शनानंतर समीक्षा करावी हा निर्णय घेतल्यानंतर, निर्मात्यांच्या मते चित्रपट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चित्रपटांबद्दल निर्णय घेत प्रेक्षकांना या गृहितकांची जाणीव होते. तसेच चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होतो. याचा फटका अनेक चित्रपटांना बसतो, ते फ्लॉप होतात. याच भितीने निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपट प्रदर्शनानंतरच समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील कलाकारांनी माध्यमांना मुलाखतही द्यायची नाही कारण, मीडिया कलाकारांच्या बोलण्याचा फायदा घेत खोट्या बातम्या पसरवतात.

Bollywood Movies
कपिल शर्माचा थक्क करणारा प्रवास आला समोर, Zwigato चा ट्रेलर रिलीज

या निर्णयांसोबतच थिएटर मालकांकडे अशी विनंती करण्यात आली की, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी शोच्या वेळी सिनेमागृहात अथवा मल्टिप्लेक्समध्ये युट्युबरला प्रवेश देऊ नये. यामुळेही ग्राहकांवर प्रभाव पडू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com