वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या The Kerala Storyची विकेंडला धमाकेदार कमाई; जाणून घ्या तिसऱ्या दिवसाचं Collection...

पहिल्या आठवड्यात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी, या विकेंडला चित्रपटाने कशी कमाई केली, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
The Kerala Story Box Office Collection Day 3
The Kerala Story Box Office Collection Day 3Twitter

The Kerala Story Box Office Collection Day 3: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र कमालीचा चर्चेत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट वादात सापडला होता, सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली जात होती, चित्रपटासमोर अनेक वाद समोर असताना ही ५ मे २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सोबतच चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद ही दिला. पहिल्या आठवड्यात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी, या विकेंडला चित्रपटाने कशी कमाई केली, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

The Kerala Story Box Office Collection Day 3
Uorfi Javed Post For GEA 2023: माधुरी दीक्षितमुळे ऐनवेळी उर्फीला इव्हेंटमधून बाहेर काढले; पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप

सुदीप्तो सेन दिग्दर्शित‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असला तरी चित्रपटाने पहिल्याच विकेंडला छप्पर फाडके कमाई केली आहे. चित्रपटाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे तर ‘द केरला स्टोरी’ने पहिल्या दिवशी 8.3 कोटींचा, तर दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी चित्रपटाने 11.22 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशातच आता चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

चित्रपटाने रविवारी केलेल्या कमाईचे प्रारंभिक आकडे पाहता, चित्रपटाच्या कमाईत विकेंडला चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, ‘द केरला स्टोरी’ने रिलीजच्‍या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी 16.50 कोटींची धमाकेदार कमाई केली आहे. सोबतच चित्रपटाने आतापर्यंत एकूण 35.75 कोटींची कमाई केली आहे.

The Kerala Story Box Office Collection Day 3
Swabhiman- Shodh Astitvacha: ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत...

‘द केरला स्टोरी’मध्ये केरळमधील 3 मुलींची कथा चित्रित करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांचे ब्रेनवॉशिंग करून धर्मांतर केले जाते आणि त्यानंतर दहशतवादी संघटना ISIS मध्ये कशाप्रकारे सामील केले जाते, यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बराच वादाच्या भोवऱ्यात सापडला.

या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही अनेक राजकीय नेते करत होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती याचिका फेटाळण्यात आली होती.

चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी मुख्य भूमिकेत आहेत. या चौघींच्या ही अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com