Unlock Zindagi Trailer: भयाण वास्तव पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर; Unlock Zindagi चा मन हेलावून टाकणारा ट्रेलर प्रदर्शित

लॉकडाऊनमधील हे भयान वास्तव लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
Unlock Zindagi Poster Out
Unlock Zindagi Poster OutInstagram

Unlock Zindagi Film Trailer: दोन वर्षांपूर्वी सर्वांनीच एका भयान संकटाचा केला, त्यात काहींनी आपले प्राण सोडले, तर काहीजण त्यातून वाचले. कोरोना महामारीने अवघ्या जगावर काही दिवसातच जगभर हाहाकार माजवला. कोरोनाच्या विळख्यात अख्ख जग असं अडकलं की, सर्वांचच आयुष्य ठप्प झालं. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, उद्योगधंदे, मंदिरे, दळणवळणाची साधने सर्वांचेच चक्र थांबले. निर्मनुष्य रस्ते पाहून जीव नुसता घाबरा व्हायचा. लोकांचे एकमेकांना भेटणे थांबले. या महामारीत कित्येकांनी आपले प्राण गमावले, अनेकांचे भावनिक, आर्थिक, अशा सगळ्याच बाजूने नुकसानही झाले.

Unlock Zindagi Poster Out
TV Actor Blessed With Second Child: असुर फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा

आजही हे भयाण वास्तव आठवलं तरी, अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. लॉकडाऊनमधील हे भयान वास्तव लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. रियल रील्स प्रस्तुत, राजेश गुप्ता निर्मित, दिग्दर्शित ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेचे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. (Bollywood Actor)

Unlock Zindagi Poster Out
P.S 2 Box Office Collection: बहुप्रतिक्षित पोन्नियन सेल्वनची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; पहिल्याच दिवशी अटकेपार झेंडा

ट्रेलरमधील पहिलाच सीन काळजाचा ठोका चुकवणारा आहे. यात एक स्वार्थी व्यावसायिक, फ्रँटलाईन वर्कर,त्याची काळजी करणारी बायको, गृहिणी, दोन असाह्य स्त्रिया यांची कहाणी दिसत आहे. या सगळ्यांचे आयुष्य समांतर जात असतानाच प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. ट्रेलरमध्ये माणुसकीचा खरा चेहरा समोर आणणारी अनेक दृश्ये यात दिसत आहेत. (Bollywood Film)

कठीण प्रसंगात रक्ताची नाती कशी मागे फिरतात आणि अनोळखी कसे मदत करतात, याचे दर्शनही यातून होत आहे. माणसाच्या मनाचे परिवर्तन करणाऱ्या या चित्रपटाची लंडन, मेक्सिको, पॅरिस आणि टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्येही निवड झाली आहे. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

Unlock Zindagi Poster Out
Kiran Mane Post: प्रसिद्धीच्या शिखरावर पण पाय जमिनीवर... पारावर बसून किरण मानेंनी व्यक्त केली भविष्याची काळजी

दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता म्हणतात, “ही खूप साधी गोष्ट आहे, ज्याचा अनुभव कोरोनाच्या काळात अनेकांनी अनुभवला आहे. एक गंभीर विषय त्याचे गांभीर्य जाऊ न देता विनोदी पद्धताने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण पुण्यात झाले आहे. लॅाकडाऊन संपल्यानंतर पुण्यात लॅाकडाऊनचे चित्रीकरण करणे, निश्चितच आव्हानात्मक होते. तरीही आम्हाला अपेक्षित असे चित्रीकरण आम्ही केले. कोरोनाच्या काळातील अस्सल स्थिती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. माणसाचे मतपरिवर्तन करणारी ही कथा आहे. या चित्रपटाची दादासाहेब फाळके पुरस्कारासह आठ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली असून त्यापैकी दोन चित्रपट महोत्सवात आम्हाला ‘बेस्ट फिचर फिल्म’ आणि ‘बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म’चा पुरस्कारही मिळाला आहे.” (Bollywood News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com