कपिलच्या ‘Zwigato’ची बॉक्स ऑफिसवर पिछाडी, सलग दुसऱ्या दिवशी अपयश

नंदिता दास दिग्दर्शित ‘Zwigato’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर पिछाडीवर पडण्याची शक्यता आहे, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी खूप कमी कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची कमाई.
Zwigato Film
Zwigato FilmSaam Tv

Zwigato 2nd Box Office Collection: नंदिता दास दिग्दर्शित ‘Zwigato’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत होते. नेहमीच आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या कपिलची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात कपिलने खूपच गंभीर भूमिका साकारली असून त्याच्यासोबत चित्रपटात मुख्य भुमिकेत शहाना गोस्वामी आणि तुषार आचार्य आहे.

चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्याची शक्यता अनेकदा सोशल मीडियावर झाली होती. पण चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे दिलासादायक कमाई करु शकला नाही. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीच्या कमाईत निर्मात्यांना फार निराशा सहन करावी लागली आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाची कमाई.

Zwigato Film
Gauri Kulkarni: ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा अपघात, पायाला गंभीर दुखापत

17 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Zwigato’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या दिवशी केवळ 42 लाख रुपयांची कमाई केल. शनिवार आणि रविवारी चित्रपट कशी कमाई करतोय अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी ‘Zwigato’चे कलेक्शन आणखी कमी झाले.

सॅकलिनच्या रिपोर्टनुसार, 'Zwigato'चे दुसऱ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ 65 लाख रुपये होते. म्हणजेच या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 1.7 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट रविवारी किती कोटींचा गल्ला जमवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Zwigato Film
'पठान' नंतर ‘Tu Jhoothi Main Makkaar’ १०० कोटींच्या क्लबमध्ये; अवघ्या आठवड्यातच केली छप्पर फाड कमाई

कपिल शर्मा आणि शहाना गोस्वामी अभिनीत ‘Zwigato’ चित्रपटाची कथा एका डिलिव्हरी बॉयच्या आयुष्याभोवती फिरते. हा चित्रपट डिलिव्हरी बॉय मानस (कपिल शर्मा) च्या संघर्षाची कथा सांगते. कोरोनाच्या काळात मानसची नोकरी कशी गेली आणि मग त्याने डिलिव्हरी बॉय बनून आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलली.

कपिल आणि शहाना यांनी व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. कपिलने त्याच्या गंभीर व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. त्याचबरोबर शहाना गोस्वामीच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com