Biopic In Bollywood: आर्यन खान प्रकरणातील हिरो समीर वानखेडेवर येणार बायोपिक

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बायोपिक.
Biopic on Sameer Wankhede
Biopic on Sameer WankhedeSaam TV

Biopic On Sameer Wankhede: सिनेसृष्टीतील बायोपिकचा ट्रेंड सध्या कमी झालेला दिसून येत आहे. अनेक निर्मात्यांचे बायोपिक या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बायोपिक बनणार असल्याचे वृत्त आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रसिद्धीझोतात आले होते. या वर्षअखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित बायोपिक 'मैं अटल हूं'च्या निर्मात्यांपैकी एक झीशान अहमद मुंबईत NCB अधिकारी म्हणून तैनात असलेल्या समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये टीव्ही पत्रकार निधी राजदानचाही समावेश आहे.

समीर वानखेडे यांचा बायोपिक लिहिणाऱ्या प्रीतम झा यांनी सांगितले की, 'या चित्रपटात वानखेडे यांच्या आयुष्याशी संबंधित असे पैलू सांगण्यात येणार आहेत, ज्यांबद्दल अजूनही लोकांना माहिती नाही.

Biopic on Sameer Wankhede
Anupam Kher: अनुपम खेर काली चरणी लीन, परम मित्रासाठी केली खास प्रार्थना

चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या कास्टिंगचे काम सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. समीरच्या भूमिकेसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांशी बोलणी सुरू असून, चित्रपटाचे स्क्रिप्टिंग पूर्ण झाल्यानंतर कोणाला फायनल केले जाईल, हे समोर येईल.'

2008 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, समीर वानखेडे हे मुंबईत भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी म्हणून रुजू झाले. तीन वर्षांनंतर विमानतळावर क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी जप्त केल्याप्रकरणी ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. सीमाशुल्क मंजुरीनंतरच विश्वचषक ट्रॉफी परत करण्यात आली. 2013मध्ये समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंगला विहित मर्यादेपेक्षा जास्त विदेशी चलन घेऊन प्रवास करत असल्याने त्याला विमानतळावर थांबवले. या प्रकरणात मिका सिंगला जामीन घ्यावा लागला होता.

2019 मध्ये, समीर वानखेडे यांना मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या झोनल डायरेक्टरचा पदभार मिळाला. रिपोर्ट्सनुसार, समीर वानखेडे यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकून 1700 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या छाप्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांची नावे समोर आली आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये, एनसीबीने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष यांना गांजा बाळगल्याच्या आणि सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबर 2021 रोजी अंमली पदार्थ सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर समीर वानखेडे पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आले होते. या प्रकरणाबद्दल त्यांच्या विभागावर बरीच टीका झाली आणि नंतर तपासादरम्यान आर्यन निर्दोष असल्याचे आढळले. यापूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी समीर वानखेडे यांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना ताब्यात घेतले होते.

सध्या समीर वानखेडे सध्या चेन्नई येथे तैनात असल्याचे म्हटले जात आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडेकरसोबत दुसरे लग्न केले. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यांचे पहिले लग्न डॉ. शबिना कुरेशी यांच्याशी झाले होते, ज्यांना दोघांना एक मुलगा आहे. तर दुसऱ्या लग्नानंतर समीर यांनी दोन जुळ्या मुलींचे वडील झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com