Ulajh First Look: जान्हवी कपूर आता बनणार IFS, नवीन सिनेमाचं पोस्टर चर्चेत, दिग्गज कलाकारांची फौज

सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
Ulajh First Look
Ulajh First LookSaam Tv

Janhvi Kapoor in Movie Ulajh: जान्हवी कपूर जान्हवी कपूर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.'धडक' 'मिली', 'गुडलक जेरी', 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यांसारख्या चित्रपटांतून तिने तिचा यशस्वी प्रवास केला आहे. बॉलिवूडची अप्सरा म्हणून जान्हवीची ओळख आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री जान्हवी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतीच जान्हवीच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे.

Ulajh First Look
Adipurush Trailer Crossed 50 Million Views: आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर एका दिवसात मिळाले 50 मिलियन व्ह्यूज

'उलझ' असे जान्हवीच्या चित्रपटाचे नाव असून ती सध्या त्यामुळे चर्चेत आहे. चित्रपटात जान्हवीसह गुलशन देलैया आणि रोशन मैथ्यू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर सुधांशू सरिया चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटांची घोषणा केली असली तरी चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही. उलझ या चित्रपटात जान्हवीच्या घोषणेने चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता वाढली आहे.

Ulajh First Look
Monalisa Viral Photos: 'त्याने माझे हृदय चोरले....' मोनालिसाची पोस्ट होतेय व्हायरल

अभिनेत्री जान्हवीसह 'उलझ' चित्रपटात राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. या महिन्याच्या शेवटी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. चित्रपटात जान्हवी एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी IFS अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला असून जान्हवीचा लूक लक्षवेधी आहे. (Latest Entertainment News)

अभिनेत्री जान्हवीने आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटाबद्दल बोलताना जान्हवी कपूरने "उलझ' या चित्रपटासाठी माझी निवड केल्यामुळे मी खूप आनंदी आहे. जेव्हा मला 'उलझ'च्या स्क्रिप्टसाठी संपर्क करण्यात आला आणि चित्रपट निर्मात्यांनीच माझी निवड केली. एक अभिनेत्री म्हणून माझी जी इच्छा होती ती संधी उलझ या चित्रपटाने मला दिली आहे"

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटातून जान्हवीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यानंतर अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये जान्हवीने तिची जादू दाखवली आहे. चाहते आता जान्हवीच्या नवीन चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com