Kartik Aaryan: कार्तिकने 'दृश्यम 2' आणि ' भुल भुल्लैया 2'साठी लढवले तर्क, कार्तिकने केला 'हा' खुलासा...

कार्तिकने ‘दृश्यम २’ आणि ‘भूल भुलैय्या २’ यांच्यातले नाते चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
Kartik Aaryan Instagram Post Gone Viral
Kartik Aaryan Instagram Post Gone ViralInstagram/@kartikaaryan

Kartik Aaryan and Ajay Devgan Spotted Together: सध्या बॉलिवूड चित्रपटांत अग्रस्थानी असलेला चित्रपट म्हणजे ' दृश्यम 2'. या चित्रपटाने सर्वत्र आपली घोडदौड कायम ठेवली आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अजय देवगण असून त्याच्या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच नवा विक्रम केला आहे. चित्रपटातील कलाकारांचे मुख्य भूमिका, कथा आणि अभिनयाने सर्वांना भुरळ घातली आहे.

चित्रपटाचे कौतुक प्रेक्षक, चित्रपट समीक्षक आणि बॉलिवूड कलाकार करीत आहे. अशातच बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यनने या चित्रपटासाठी एक विशेष पोस्ट लिहिली. विशेष म्हणजे कार्तिकने ‘दृश्यम २’ आणि ‘भूल भुलैय्या २’ यांच्यातले नाते चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Kartik Aaryan Instagram Post Gone Viral
Shahrukh Khan Mannat Bungalow: किंग खान शाहरुखचा 'मन्नत' हिऱ्यांनी सजला

सध्या बॉलिवूडसह अनेक कलाकार मंडळी गोव्यात इफ्फीसाठी उपस्थित आहे. त्यामध्ये अजय देवगण आणि कार्तिक आर्यनही गोव्यात उपस्थित आहे. यावेळी कार्तिकने त्याचा आणि अजयचा काढलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटो खालील कॅप्शनने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे. याचं कारण म्हणजे त्याने कॅप्शनमधून ‘भूल भुलैय्या २’मधील रूह बाबा आणि ‘दृश्यम २’ मधला विजय साळगावकर २ ऑक्टोबरला एकत्र होते असा खुलासा त्याने केला. (Bollywood)

कार्तिकने त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “विजय साळगावकर आणि रूह बाबा त्यांनी २ ऑक्टोबरला गोव्यात एकत्र पावभाजी खाल्ली आणि ३ ऑक्टोबरला सत्संग करून ते मुंबईत आले. पावभाजी खूप छान होती.” कार्तिकची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरली. या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना रूह बाबा आणि विजय साळगावकर म्हणून एकत्र बघायला आवडेल असं म्हटलं आहे. (Celebrity)

‘दृश्यम’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उत्कंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही यशस्वी घोडदौड सुरु आहे. (Movie)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com