Anupam Kher Video: 'मी घाबरतो तरीही...' ६८व्या वर्षी अनुपम यांनी सांगितली मनातली भीती

अनुपम खेर यांनी वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Social Media Post Of Anupam Kher
Social Media Post Of Anupam KherInstagram @anupampkher

Anupam Kher Social Media Post: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांचा आज म्हणजे ७ मार्चला वाढदिवस आहे. अनुपम आज ६८ वर्षाचे झाले आहेत. अनुपम सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अनुपम खेर हे अभिनयाव्यतिरिक्त अनेक नवनवीन गोष्टी करत असतात. ते कधी त्यांचे वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर करतात, तर कधी आईसोबतचे अतरंगी व्हिडिओ. यावेळी त्यांनी स्विमिंग करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या हे धाडस करण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.

Social Media Post Of Anupam Kher
Anupam Kher Birthday: 37 रुपये घेऊन घर सोडले, आज करोडोच्या संपत्तीचे मालक आहेत अनुपम खेर

अनुपम व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, 'आज माझा ६८वा वाढदिवस आहे. ८ वर्षांपूर्वी मी ठरवले की प्रत्येक वर्षी मी स्वतःला असे काही करण्याचे एक चॅलेंग देईन, ज्यामुळे लोक मला हा स्टुपिड प्रश्न विचारतील की या वयात तू हे कसं करतोस?, गेल्यावर्षी मी माझा बेअर बॉडी फोटो पोस्ट करायचे ठरवले होते. त्यासाठी खूप हिंमत लागते.

मी यावर्षी स्विमिंग करायचे ठरवले आणि १० दिवसापूर्वी याची सुरुवात केली. या १० दिवसात मी स्विमर जरी झालो नसलो तरी माझी पाण्याविषयीची भीती निघून गेली आहे. मनात कसलीही धाकधूक न बाळगता मी पाण्यात राहू शकतो, मी पाण्यावर तरंगू शकतो. आपल्याला स्वतःच्या सीमा स्वतःच ठरवायच्या असतात. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करू शकता. मी स्विमिंग शिकणार आहे. या मागचे उद्देश एकच आहे. ६० वर्षावरील तसेच तरुणांना प्रोत्साहित करणे. मी घाबरतो तरीही...'

तसेच हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 'मला वाढदिवसाच्या शुभेच्छा 😄! प्रत्येक येणाऱ्या वर्षात, मला काहीतरी नवीन करायचे आहे. मी नवीन क्षितिजे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मला माहीत आहे की काहीही घडू शकते! मला अजिबात पोहता येत नव्हते. अजूनही येत नाही. पण मी प्रयत्न सुरू केले आहेत! तुम्हाला कदाचित काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा मिळेल! इतक्या वर्षांच्या तुमच्या सर्व प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. चला आता मला शुभेच्छा द्या !! जय हो! #Happy BirthdayToMe #NewHorizons #Swimming' असे अनुपान यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अनुपम यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांच्या चाहते देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

या व्हिडिओ आधी अनुपम यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये अनेक व्हिडिओंचा समावेश आहे. या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या अभिनय शाळेतील मुलांनी त्यांच्या जीवन प्रवास एक पथनाट्याच्या माध्यमातून दाखवला आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी अनुपम यांनी ही पोस्ट केली आहे.

अनुपम ६८ वर्षाचे झाले असले तरी त्यांच्या उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. 'द कश्मीर फाईल्स' नंतर ही त्यांचे अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्या 'शिव शात्री बालबोवा' चित्रपट प्रदर्शित झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com