Lakme Fashion Week: इरफान खानच्या मुलाची सगळीकडेच हवा, लॅक्मे फॅशन वीकमुळे चर्चेत

बाबिल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबिल लॅक्मे फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
Babil Khan
Babil KhanInstagram @babil.i.k

मुंबई: हिंदी मीडियम, अँग्रेजी मीडियम, लंच बॉक्स, स्लमडॉग मिलेनियर, लाइफ ऑफ पाय आणि ज्युरासिक वर्ल्ड यांसारख्या बॉलीवूड (Bollywood) आणि हॉलिवूड (Hollywood) चित्रपटांमधून छाप पडणार अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाही. पण त्याचा मुलगा बाबिल खान त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहे. अलीकडेच बाबिल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाबिल लॅक्मे फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक करताना दिसत आहे. बाबिलची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

Babil Khan
Happy Birthday Swapnil Joshi : वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया चॉकलेट बॉय स्वप्निलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

लॅक्मे फॅशन वीकचा (Lakme Fashion Week) एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये इरफान खानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) पवन सचदेवासाठी रॅम्प वॉक करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ग्रे कलरचा सूट घातला आहे, ज्यावर काळ्या रंगाचे पट्टे आहेत. यासोबतच त्याने काळ्या रंगाचे झिप असलेले टी-शर्टही कॅरी केले आहे. या वॉकमध्ये बाबिल खूपच स्टायलिश दिसत आहे. यावरून तो किती कॉन्फिडन्ट आहे हे समजते. रॅम्पवर चालताना तो लोकांना फ्लाइंग किस देत आहे. त्यानंतर तो सचदेवासोबत रॅम्पवर वॉक करताना दिसत आहे. या शोमध्ये बाबिलने शोस्टॉपर भूमिका पार पाडली.

बाबिल खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हजारो लोकांनी त्याच्या स्टाईलला पसंती दर्शवली आहे. काही यूजर्स त्याला त्याच्या वडिलांची कार्बन कॉपी म्हणत आहेत. एका यूजरने त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे तिथे इरफान खानच्या चाहत्यांनी त्याची आठवण काढली आणि त्याच्यापेक्षा चांगला अभिनेता कोणीच असू शकत नाही, अशी टिप्पणी केली.

इरफान खान (Irrfan Khan) यांचे 2020 मध्ये निधन झाले. त्यावेळी इरफान खानचा मुलगा बाबील 20-21 वर्षांचा होता. तो त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याने 2017 च्या 'करीब करीब सिंगल' चित्रपटात कॅमेरा सहाय्यक म्हणून काम केले. त्याने गेल्या वर्षी 2021 मध्ये नेटफ्लिक्सवरील चित्रपटात देखील काम केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com