'दिल की धडकन' माधुरी दीक्षित पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत; 'Maja Ma' चा टीझर बघाच!

माधुरीच्या आगामी 'मजा मा' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
Maja Ma Movie News
Maja Ma Movie NewsSaam Tv

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) मनोरंजनसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. माधुरी तिचे नवनवीन प्रोजेक्ट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येते. नेटफ्लिक्स मालिका 'द फेम गेम' नंतर माधुरी दीक्षित दुसऱ्या ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाली आहे. नुकताच माधुरीच्या आगामी 'मजा मा' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये माधुरीची आजवर कधीही न पाहिलेली भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

टीझरच्या सुरुवातीलाच माधुरी सजवलेल्या खोलीत एकटीच नाचताना दिसत आहे. या चित्रपटात माधुरीच्या मुलाची भूमिका ऋत्विक भौमिकने केली आहे. यामध्ये बरखा सिंह माधुरीच्या मुलाची मैत्रीण बनली आहे. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, पण माधुरी त्यांच्या लग्नाबद्दल संभ्रमात असल्याचे दिसते आहे. बरखाचे आई-वडील या नात्यावर खूश आहेत का, असे माधुरीने ऋत्विकला विचारले. जेव्हा तो सांगतो की ते खरोखर आनंदी आहेत, तेव्हा माधुरी त्याला ती कदाचित हे नाते स्वीकारणार नाही असे सांगून आश्चर्यचकित करते. ती एका टिपिकल भारतीय आईच्या भूमिकेत आहे.

'मजा मा' हा आनंद तिवारी दिग्दर्शित आणि सुमित बठेजा लिखित कौटुंबिक ड्रामा आहे. माधुरी दीक्षितशिवाय गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा, सिमोन सिंग, मल्हार ठकार आणि निनाद कामत हे कलाकारांचा समावेश आहे.

Maja Ma Movie News
'बिग बॉस' फेम तेजस्वी प्रकाशचे गोव्यात घर; बॉयफ्रेडनंच दिली 'ही' माहिती

अलिकडेच चित्रपट दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी 'मला खरोखर विश्वास आहे की प्रेक्षक सध्या वेगळ्या कथेच्या शोधात आहे. दर्शकांना नवीन शैली आणि नवीन अनुभव एक्सप्लोर करायचे आहेत आणि 'मजा मा' कडे हे सर्व आहे.' असं सांगितले आहे.

पुढे त्याने , 'प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारी आणि त्यांना हसवणाऱ्या या सुंदर कथेमध्ये अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने भूमिकेत जिवंतपणा आणला आहे. मला आनंद आहे की 'मजा मा' धमाकेदार प्रदर्शित होईल. भारतीय सामग्री जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे हे खरोखरच दिलासादायक आहे.असंही म्हटलं आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com