Drishyam 2 Collection: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका; 'पैसा वसुल' चित्रपट लवकरच १५० कोटी पार जाणार

'दृश्यम 2'चे शो सातत्याने बुक होत असून चित्रपटाने आतापर्यंत सहजपणे १०० कोटींहून अधिकचा पल्ला पार केला आहे.
Drishyam 2
Drishyam 2Saam Tv

Drishyam 2 Collection: अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या वर्षात बॉलिवूडमधील अनेक चित्रपट बॉयकॉटमुळे फ्लॉप झालेले दिसले.'दृश्यम 2'चे शो सातत्याने बुक होत असून चित्रपटाने आतापर्यंत सहजपणे १०० कोटींहून अधिकचा पल्ला पार केला आहे. शनिवार आणि रविवारी चित्रपटाची कमाई चांगली होती. वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा 'भेडिया' चित्रपटापेक्षा विजय साळगावकर दिग्दर्शित 'दृश्यम 2' चित्रपटाला पाहण्यास प्रेक्षकांनी पसंती दर्शवली.

Drishyam 2
Sakhi Gokhale: 'गोखले काका आणि माझे बाबा...' सखी नेटकऱ्यांवर संतापली, कारण?

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहता वीकेंडला अधिकाधिक प्रेक्षकवर्ग मिळतील अशी अपेक्षा होती, आणि तसेच घडले. शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, 10 व्या दिवसापर्यंत चित्रपटाची एकूण कमाई 143.90 कोटी रुपये इतकी होती. त्यानुसार हा चित्रपट लवकरच 150 कोटींचाही आकडा सहज गाठण्याची शक्यता आहे.

Drishyam 2
Bigg Boss 16: गोल्डन मॅनची 'बिग बॉस १६मध्ये एन्ट्री, घरातील समीकरणे बदलणार का?

'दृश्यम'चे दोन्हीही भाग प्रेक्षकांना भरपूर आवडले आहे, पण क्लायमॅक्सने सर्वाधिक प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. चित्रपटाचा शेवट पाहिल्यानंतर चाहते 'पैसा वसुल' चित्रपट म्हणत आहेत. विजय साळगावकर दिग्दर्शित चित्रपट म्हणजेच अजयची स्टाईल लोकांना टाळ्या वाजवायला भाग पाडते.

तरण आदर्शने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने शुक्रवारी 7.87 कोटी, शनिवारी 14.05 कोटी आणि रविवारी 17.32 कोटींची कमाई केली. चित्रपटाची १० दिवसात एकूण कमाई 143.90 कोटी रुपये झाली आहे.

ट्रेड अॅनालिस्ट्सच्या मते, 'दृश्यम 2' ची कमाई आगामी काळात 'भेडिया'च्या तुलनेत सुरू राहू शकते. म्हणजेच जोपर्यंत पुढचा मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाही तोपर्यंत 'दृश्यम 2' ला अधिकाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या नावावर एक नवा विक्रम होऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com