OTT Release Movie: अमिरच्या 'लाल सिंग चढ्ढा'ची ओटीटीवरही मुसंडी; लो बजेट चित्रपटाला सर्वाधिक पसंती

अमीर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांवर खास भूरळ घातली नाही पण ओटीटीवर तरी चित्रपट यशस्वी ठरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Lal Singh Chaddha Poster
Lal Singh Chaddha Poster Saam Tv

मुंबई: अनेक चित्रपटांनी बॉयकॉट ट्रेंडमुळे (Boycott) म्हणावी इतकी खास कमाई केली नाही. त्यात अमीर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' ने जबरदस्त बॉक्स ऑफिसवर मुसंडी मारली (Bollywood). दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित (Box Office Collection) झाले होते. पण दोन्हीही चित्रपटांनी प्रेक्षकवर्ग आपल्याकडे वळवण्यात कुठे तरी अपयशी ठरले. दोन्हीही चित्रपटात बरेच दिग्गज कलाकार मंडळी असूनही प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहात गेले नाहीत. (OTT Release)

Lal Singh Chaddha Poster
Shah Rukh Khan Upcoming Movie: 'जवान'चे शूटिंग संपले: शाहरुख शिकतोय चिकन 65ची रेसिपी

लाल सिंग चढ्ढा हॉलिवूड मधील 'फॉरस्ट गम्प' चित्रपटाचा रिमेक आहे. तर दुसरीकडे अक्षय मुख्य भूमिकेत असलेल्या रक्षाबंधन चित्रपटाने प्रेक्षकांवर भूरळ घालण्यात अपयशी ठरला. अखेर दोन्हीही चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. Zee 5 वर सर्वात आधी 'रक्षाबंधन' चित्रपट प्रदर्शित झाला असून 'लाल सिंग चढ्ढा' नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दोन्हीही चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांवर खास भूरळ घातली नाही पण ओटीटीवर तरी चित्रपट यशस्वी ठरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Lal Singh Chaddha Poster
Ram Setu: अक्षयचा बहुप्रतिक्षित 'रामसेतू' लवकरच येणार; सिनेमा हिट करण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग

आमिरने प्रदर्शानापूर्वी सांगितले होते की, चित्रपट सहा महिने ओटीटीवर येणार नाही. पण त्या आधीच हा चित्रपट ओटीटीवर आल्याने चित्रपटाला सहा महिने पूर्ण झालेत का? असा सवाल नेटकरी करीत आहेत. चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटाने कमवलेली आकडेवारी पाहता, अमिरच्या लाल सिंह चढ्ढापेक्षा रक्षाबंधनचा कमी बजेट असला तरी तो शर्यतीत अव्वल आहे. सध्या तरी प्रेक्षकवर्ग नेटफ्लिक्सवर 'लाल सिंग चड्ढा' पाहण्यापेक्षा Zee 5 वरील 'रक्षाबंधन' ला सर्वाधिक पसंती देत आहेत. अक्षय कुमारने 'रक्षाबंधन' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे प्रमोशन करण्यासाठी काही खास व्हिडिओही पोस्ट केल्या होत्या. तसेच Zee 5 देखील चित्रपटाबद्दल सतत अपडेट्स देत होते. पण आमिर खानने यापैकी काहीही करताना दिसला नाही.

Zee 5 ने चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख घोषित करत 'रक्षाबंधन' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. तर दुसरीकडे नेटफ्लिक्सने कोणतीही पूर्व कल्पना न देत ठरलेल्या तारखेआधीच 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे हे सर्वांनाच मान्य करावे लागेल की, आमिरच्या चित्रपटाला मल्टिप्लेक्सप्रमाणे इथेही खास प्रेक्षकवर्ग मिळणार नाही, हे नेटफ्लिक्सने मान्य केले आहे. 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नसला तरी ओटीटी रिलीजबाबत नेटफ्लिक्सने किमान चाहत्यांना पूर्व कल्पना द्यायला हवी होती. त्यामुळे निर्माते आणि नेटफ्लिक्सच्या अशा वागण्यामुळे प्रेक्षक 'लाल सिंग चड्ढा' पेक्षा 'रक्षाबंधन' चित्रपटाला सर्वाधिक पसंती देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com