'Pathan' 5 Day: 'पठान'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, पाच दिवसातच केली दमदार कमाई...

पाचव्या दिवशी पठानने कमावले ५८.५० कोटी.
Pathan Crossed 500 Crore
Pathan Crossed 500 CroreSaam Tv

Pathan 5th Day Collection: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक महिन्यांनी बॉलिवूड चित्रपटाला इतके यश मिळले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना मागे सारत शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे.

२५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. पण या पाच दिवसात शाहरुखच्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत तर अनेक नवी रेकॉर्ड बनविले आहेत.

Pathan Crossed 500 Crore
Kangana-Urfi War: 'पठान' चित्रपटावरून उर्फी - कंगना भिडल्या, PM मोदींचाही केला वादात उल्लेख

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी काही वेळेपूर्वीच ट्विट करत 'पठान'च्या पाचव्या दिवशीचे कलेक्शन कितीआले हे जाहीर केले आहे. भारतात या चित्रपटाने ३३५ कोटी तर परदेशात २०७ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई ५४२ कोटी झाली आहे. म्हणजेच या चित्रपटाने पाच दिवसात ५०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

'पठान'ने रविवारी ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर काल या चित्रपटाचे देशातील बॉक्स ऑफिस कलेक्शन ५८.५० कोटी इतके होते. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५५ कोटी, दुसऱ्या ६८ कोटी, तिसऱ्या 38 कोटी तर चौथ्या दिवसाची कमाई ५१.५० कोटी आहे.

'पठान'चे यश साजरे करण्यासाठी शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांची भेट घेतली. मन्नत बाहेर येत शाहरुखने चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांना अभिवादन देखील केले. याच दरम्यान त्याने 'झुमे जो 'पठान' या गाण्यावरील काही डान्स स्टेप्सही केल्या.

'पठान' चित्रपटाचे कौतुक करणारी एक पोस्ट भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शेअर केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने मात्र 'पठान'वर टीका करा पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com