Anushka Sharma: अनुष्का झाली 'घोडे पे सवार', रेट्रो लूकमध्ये नवा अंदाज

अन्विता दत्ता गुप्तान दिग्दर्शित काला चित्रपट सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ बराच ट्रेंड होत आहे. या ट्रेंड होत असलेल्या व्हिडीओत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसत आहे.
Anushka Sharma
Anushka SharmaSaam TV

Anushka Sharma: अन्विता दत्ता गुप्तान दिग्दर्शित काला चित्रपट सध्या बराच प्रकाशझोतात आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. बाबिलसोबत चित्रपटात मुख्य भूमिकेत तृप्ती डिमरीनही प्रमुख भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटातील व्हिडीओ सोशल मीडियावर बराच ट्रेंड होत आहे. या ट्रेंड होत असलेल्या व्हिडीओत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसत आहे.

Anushka Sharma
Deepiaka Padukone: दीपिकाला फिफा विश्वचषकात मिळाली विशेष जबबादारी, जगातील पहिल्या अभिनेत्रीने पटकावला 'हा' मान

तब्बल ४ वर्षांनंतर अनुष्का शर्मा चित्रपटात दिसल्याने तिचे चाहते बरेच खुश झाले आहेत. तिने सोशल मीडियावर काला चित्रपटातील 'घोडे पे सवार' या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. अनुष्काच्या या व्हिडीओने रेट्रो लूकने सर्व नेटकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिने या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली आहे. अनेक वर्षांनी अनुष्का चित्रपटात दिसल्याने तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे.

नेटकऱ्याने अनुष्काचा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीले की, 'अनुष्काला चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पाहण्याचा वेगळाच आनंद आहे.' तर आणखी एकाने लिहिले की, 'अनुष्का फक्त अभिनयातच माहिर नाही तर वेगवेगळ्या गोष्टीतही बरीच माहिर आहे. ती मोठ्या पडद्यावर कधी येणार याचीच आम्ही वाट पाहत होतो. अखेर ती आली याचा आनंद आहे.'

Anushka Sharma
Hetal Yadav: अभिनेत्री हेतल यादवच्या कारला ट्रकची धडक, 'अशा प्रकारे वाचवला जीव' शेअर केली हृदयद्रावक घटना

गेल्या काही दिवसांपूर्वी अनुष्का तिच्या एका आगामी चित्रपटामुळे ती चर्चेत आली होती. तीचा मैदानावरील बॉलिंग करताना लूक बराच चर्चेचा विषय ठरला होता. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरु असून लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे नाव 'छकडा एक्सप्रेस' आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com