
बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खानने (Ira Khan) बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला नसला तरी देखील ती कायम चर्चेत असते. आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. आयराचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
आयरा तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा ती तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चांगलीच चर्चेत राहते. अशामध्ये आता आयराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयरा खानच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. ती लवकरच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) विवाहबंधनात अडकणार आहे.
बॉलिवूड अभिनत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची सध्या चर्चा होत आहे. तिच्या लग्नाची पत्रिका देखील समोर आली आहे. अशामध्ये आता आयरा खानच्या लग्नाबाबतची बातमी देखील समोर आली आहे. आमिर खानची मुलगी आयरा लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. आयरा पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये लग्न करणार आहे. आयरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे.
ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आयरा आणि नुपूर शिखरे ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. आयराच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, हे कपल ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेजनंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये पूर्ण रितीरिवाजांसह सेलिब्रेशन होणार असल्याचीही बातमी आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे आणि लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील कोणालाही आमंत्रित केले जाणार नसल्याचे बोलले जात आहे.
एका जवळच्या सूत्राने सांगितले की, आमिर खान आपल्या मुलीच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे आणि त्याने लग्नाची तयारी देखील सुरू केली आहे. आयरच्या लग्नाची तारीख समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना लग्नाबाबत खूपच उत्सुकता लागली आहे. आयरा आणि नुपूर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट केली होती. एंगेजमेंटला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आयराच्या एंगेजमेंटचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये आमिर खान डान्स करताना दिसला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.