
बॉलीवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याचे किरण रावसोबत लग्न. त्यानंतर किरण रावला देखील त्याने घटस्फोट दिला. सध्या आमिर खानचे फातिमा सना शेखसोबत अफेअर सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशामध्येच आता आमिर खान आणि रीना दत्ता पुन्हा एकत्र आले की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचा एकत्र असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आमिर खान आणि रीना दत्ता नुकताच वांद्रे येथे स्पॉट झाले. दोघांना एकत्र पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. एका कार्यक्रमातून बाहेर पडताना दोघे जण दिसले. पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद केलं. कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिले, सोबत पोझ दिल्या, त्यानंतर दोघेही एकाच गाडीमध्ये बसून गेले. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आमिर खान आणि रीना दत्ता हे दोघेही खूपच खूश असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. यावेळी आमिर खानने प्रिंटेड कुर्ता आणि ब्लॅक पँट परिधान केली होती. तर रीना दत्ताने पर्पल कलरचा कुर्ता आणि व्हाइट पँट परिधान केली होती. रिना दत्ताच्या हातामध्ये एक पुस्तक देखील दिसून आले. दोघेही या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते.
आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील ते एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी आमिर खानने पुतण्या मंसूर खानच्या बुक लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली होती. त्यावेळी आमिर खानच्या दोन्ही एक्स वाईफ रीना दत्ता आणि किरण राव देखील आल्या होत्या. यावेळी आमिरच्या दोन्ही एक्स वाईफने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोझ दिल्या होत्या.
दरम्यान, आमिर खान सध्या चर्चेत आहे ते म्हणजे तो अभिनेत्री फातिमा सना शेखला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. फातिमाने 'दंगल' चित्रपटात आमिर खानसोबत काम केले होते. या चित्रपटात तिने आमिर खानची मुलगी गीता फोगाटची भूमिका साकारली होती. पण आमिर खान आणि फातिमा अद्याप आपल्या रिलेशनशीपबद्दल खुलेपणाने सांगितले नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.