
बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी कुमार' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अक्षय कुमारने बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराचे (Mahakaleshwar Temple in Ujjain) दर्शन घेतले.
यावेळी अक्षय कुमारसोबत त्याचा मुलगा आरव, बहीण अलका हिरानंदानी आणि भाची सिमर हे होते. अक्षयने आपल्या कुटुंबीयांसोबत मध्यरात्री २ वाजता नंदी हॉलमध्ये ध्यान केले. त्यानंतर ते भस्म आरतीमध्येही सहभागी झाले होते. अक्षय कुमारचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षय कुमारने महाकाल मंदिरामध्ये पूजा आणि प्रार्थना केली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय भगवान महाकालच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन कुटुंबासह भस्म आरतीच्या वेळी नंदी हॉलमध्ये बसलेला दिसत आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी 'मिशन राणीगंज' या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थनाही केली. यावेळी क्रिकेटर शिखर धवनही भस्म आरतीमध्ये सहभागी झाला होता. बॅडमिंटनपटू सायना नेहवालही नंतर महाकाल मंदिरात पोहोचली. सायना नेहवाल भोग आरतीमध्ये सहभागी झाली होती. अक्षय कुमार ऑक्टोबर २०२१ मध्ये OMG-2 चित्रपटाच्या शूटिंगसाठी उज्जैनला आला होता. या चित्रपटाचे आठवडाभर शूटिंग उज्जैनमध्ये झाले होते.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अक्षय कुमार आणि त्याचा मुलगा आरव भस्म आरतीमध्ये पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. अक्षयने केशरी रंगाचा धोतर-सोला आणि आरवने पांढरा कुर्ता-पायजमा घातला होता. सर्वांनी नंदी हॉलमध्ये बसून भगवान शिवाचा नामजप केला. त्यांनी पुजारी आशिष शर्मा यांच्यामार्फत महाकालाला जल अर्पण केले. पंडित आशिष शर्मा यांनी सांगितले की, अक्षय कुमारने भगवान महाकालबद्दल अनेक माहिती घेतली. यावेळी अक्षय कुमारने सांगितले की,'वाढदिवशी भगवान महाकालला प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा मोठी भेट काय असू शकते.'
श्री महाकाल मंदिराचे पुजारी पंडित आशिष गुरू यांनी सांगितले की, 'अक्षय कुमार इंदूरहून रस्त्याने उज्जैनला पोहोचला. येथे पहाटे चार वाजता ते महाकाल मंदिरात पोहोचले. अक्षय कुमारने यावेळी देशाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्याचे पुजाऱ्याने सांगितले. अक्षय कुमारने बाबांची भस्मी आणि काळेवा प्रसाद म्हणून घेतला. येथे गर्भगृहात प्रवेश बंद झाल्यामुळे त्यांनी गर्भगृहाच्या दाराच्या चौकटीवर नतमस्तक होऊन पूजा आणि आरती केली.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.