
बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकताच मुंबईतील पॉश एरियामध्ये नवं ऑफिस खरेदी केले आहे. मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये त्यांनी हे ऑफिस खरेदी केलं असून त्याची किंमत तब्बल २८.७ कोटी रुपये इतकी आहे. बिग बींनी ज्या इमारतीमध्ये आपले नवं ऑफिस खरेदी केले आहे त्याच इमारतीमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींनी देखील घर खरेदी केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी वीरा देसाई रोडजवळ वीर सावरकर प्रोजेक्टअंतर्गत सिग्नेचर बिल्डिंगमध्ये हे ऑफिस खरेदी केले आहे. अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या नवीन ऑफिसच्या इमारतीमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री सारा अली खान यांनी यांनी देखील प्रॉपर्टी खरेदी केली होती. या इमारतीमध्ये अभिनेत्री काजोल देखील राहते. त्याचसोबत अभिनेता अजय देवगणचे ऑफिस आहे.
फ्लोर टॅप डेटानुसार, अमिताभ बच्चन यांनी या मालमत्तेसाठी १.७२ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. ज्याचा आकार २,०९९ चौरस फूट आहे. या मालमत्तेत तीन पार्किंग स्लॉट देखील आहेत. त्याची नोंदणी १ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण झाली. ही मालमत्ता विकणारे वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्राइव्हेट लिमिटेड आहे. याच इमारतीमध्ये कार्तिक आर्यनने चौथ्या मजल्यावर १०.०९ कोटी रुपयांना घर खरेदी केले होते. त्याचे रजिस्ट्रेशन ४ सप्टेंबर २०२३ रोजी झाले होते. स्टॅम्प ड्युटीसाठी त्याने ४७.५५ लाख रुपये दिले होते.
तर अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग यांनी याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ९ कोटींचे घर खरेदी केले होते. ११ जुलैला त्याचे रजिस्टेशन झाले होते. त्यासाठी त्यांनी ४४.०१ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी दिली होती. तर अभिनेता अजय देवगण देखील ऑफिस याच इमारतीमध्ये आहे. ते त्यांनी ४५.०९ कोटी रुपयांना खरेदी केले होते. तर याच इमारतीमध्ये काजोलचे देखील घर आहे. जे तिने ७ कोटींना खरेदी केले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.