Dharmendra Health News: धर्मेंद्रांची प्रकृती खालावल्याचं वृत्त, सनी देओलच्या नीकटवर्तीयांनी अमेरिकेला जाण्याचं सांगितलं कारण

Bollywood News In Marathi: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची (Dharmendra Health News) माहिती कळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.
Sunny Deol And Dharmendra
Sunny Deol And Dharmendra Saam Tv

Bollywood Actor Dharmendra News:

बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली होती. धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला हलवण्यात आले असल्याचे वृत्त समोर आले होते. वडिलांच्या उपचारासाठी धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलने (Summy Deol) कामातून ब्रेक घेतला असून तो देखील अमेरिकेला गेला असल्याचे सांगितले जात होते.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची (Dharmendra Health News) माहिती कळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. ते त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान, इंडिया टीव्हीने सनी देओलच्या टीमशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

इंडिया टीव्हीशी बोलताना सनी देओलच्या टीमने सांगितले की, 'सनी देओल त्याचे वडील धर्मेंद्र यांना कोणत्याही उपचारासाठी नाही तर सुट्टीसाठी अमेरिकेला घेऊन गेले आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत सनी देओल आणि धर्मेड मुंबईला परत येणार आहेत.' धर्मेंद्र यांना याचवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तब्येतीचे अपडेट्स दिले होते.

धर्मेंद्र यांनी त्यावेळी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला 'मित्रांनो, मी धडा शिकलो' असे कॅप्शन दिले होते. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले होते की, माझ्या पाठीमध्ये दुखत असल्यामुळे उपचारासाठी मला रुग्णालयामध्ये दाखल केले होते असे त्यांनी सांगितले होते. रुग्णालयतील दोन ते चार दिवस खूपच कठीण होते.' धर्मेंद्र रुग्णालयामध्ये असताना त्यांच्या चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती.

दरम्यान, धर्मेंद्र 87 वर्षांचे झाले असले तरी देखील या वयातही ते चित्रपटांमध्ये काम करत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ते दिसले होते. या चित्रपटात ते आलिया भट्ट, रणवीर सिंग, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तर, सनी देओल देखील सध्या त्याच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com