
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंगचा (Ranveer Singh) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट निर्माता करण जोहर ७ वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून मोठ्या परडद्यावर परतला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील रणवीर आणि आलिया यांची लव्हकेमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मोठ्या पडद्यावर यशस्वी कामगिरी केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा मल्टीस्टारर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. करण जोहरचा हा चित्रपट या आठवड्याच्या सुरुवातीलाच Amazon Prime Video वर आला आहे. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत. तुम्ही हा चित्रपट पुढील 30 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओवर भाड्याने पाहू शकता. यानंतर तुम्ही OTT वर या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मोफत आनंद घेऊ शकता.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यापूर्वी त्यामधील ही दृश्य हटवण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी ओटीटी रिलीजपूर्वी चित्रपटात १० मिनिटांचा एक सीन जोडला आहे. काही काळापूर्वी करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा एक हटवलेला सीन शेअर केला होता. पण आता ओटीटीवर प्रेक्षकांना हा सीन पाहता येणार नाही.
चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटामध्ये रणवीर सिंगने रॉकी रंधावा या डॅशिंग पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे. तर आलिया भट्टने बंगाली टीव्ही पत्रकार राणी चॅटर्जीची भूमिका साकारली आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांमुळे दोघेही लग्नाआधी एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात.
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्याव्यतिरिक्त धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, रोनित रॉय, अर्जुन बिजलानी, क्षिती जोग, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे मु्ख्य भूमिकेत आहेत. या सर्वांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.